छत्रपती शिवरायांचे नाव 'शिवाजीच' का ठेवलं,आहे अगदी खास कारण

13  February 2025

Created By : मयुरी सर्जेराव

शिवरायांचा जन्म पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरानजीक शिवनेरी या डोंगरी किल्ल्यावर झाला.

छत्रपती शिवाजी महाराज हे भोसले कुळातील होते.

शिवाजी महाराजांचे नाव शिवाई या देवतेवरून ठेवण्यात आल्याचे असे सांगतिले जाते.

आख्यायिकेनुसार शिवनेरी गडावरील शिवाई देवीला जिजाबाईंनी आपल्याला बलवान पुत्र व्हावा अशी प्रार्थना केली होती

म्हणून जेव्हा शिवबा जन्माला आले तेव्हा त्यांचे नाव 'शिवाजी' असे ठेवण्यात आले.

जिजाऊ आणि उमाबाईंनी बाळाचे नाव 'शिवाजी' असे ठेवले होते

हा नामकरण सोहळा उत्साहात आणि नवीन परंपरांचा स्वीकार करत पार पडला.

प्रकाश पवार यांच्या ‘सकलजनवादी छत्रपती शिवराय’या पुस्तकात ही माहिती नमूद आहे.