या दिग्गजांना मिळाला पद्म पुरस्कार,

26 January 2024

Created By : Manasi Mande

केंद्र सरकारकडून प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.

देशाचे माजी उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.

तसेच  अभिनेता चिरंजीवी यांनाही पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.

महाराष्ट्रातील क्रीडा, मल्लखांब प्रशिक्षक उदय विश्वनाथ देशपांडे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.

तसेच महाराष्ट्रातील मनोहर डोळे (औषधी) यांनाही पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.

 दिग्गज अभिनेत्री वैजयंतीमाला यांनाही कला क्षेत्रातील योगदानासाठी पद्मविभूषण पुरसक्काराने गौरवण्यात येणार आहे.

तसेच बिंदेश्वर पाठक  यांनाही (समाजसेवा मरणोत्तर) हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

सुप्रीम कोर्टाच्या पहिल्या महिला न्यायाधीश फातिमा बीवी यांना पद्म भूषण (मरणोत्तर) पुरस्कार जाहीर झाला आहे.

अभिनेता मिथून चक्रवर्ती यांनाही पद्म भूषण  पुरस्काराने गौरवण्यात येईल.

 वरिष्ठ कार्डिओलॉजिस्ट अश्विन बालचंद मेहता यांनाही पद्म भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.

माजी केंद्रीय मंत्री राम नाईक यांचेही नाव पद्म भूषण पुरस्काराच्या मानकऱ्यांच्या यादीत आहे.

श्रीमती पद्मा सुब्रमण्यम यांचेही नाव समाविष्ट आहे.