Lpg Gas Crisis : घरगुती गॅस सिलेंडरचा रंग लालच का? जाणून घ्या

22 मार्च  2026

Created By:  संजय पाटील

आखाती देशातील युद्धामुळे भारतातील प्रत्येक शहरात  घरगुती गॅसचा तीव्र तुटवडा पाहायला मिळत आहे. 

भारतात लाल आणि निळा अशा 2 रंगांचे सिलेंडर आहेत. लाल रंगाचा सिलेंडर घरगुती तर निळ्या रंगाचा सिलेंडर व्यावसायिक वापरासाठी आहे.

घरगुती वापरासाठी असलेल्या सिलेंडरचा रंग लालच का असतो? याचं  कारण आयओसीएल   कंपनीने सांगितलंय.

लाल रंगाची वेवलेंथ जास्त असते. त्यामुळे हा रंग दुरूनही सहज दिसतो. तर लाल रंग हा धोक्याचा रंग आहे.

लाल रंगामुळे सतर्कतेचा इशारा मिळतो. त्यामुळे घरगुती वापराच्या सिलेंडरचा रंग हा लाल निश्चित करण्यात आला आहे.

तसेच व्यावसायिक आणि घरगुती वापरासाठीचा सिलेंडर यातील फरक समजावा यासाठी रंगाचा फरक ठेवण्यात आला आहे.

व्यावसायिक सिलेंडरमध्ये घरगुती सिलेंडरपेक्षा जास्त गॅस असतो. त्यामुळे व्यावसायिक सिलेंडरची किंमत जास्त असते.