10 जून 2026
Created By: संजय पाटील
फिफा वर्ल्ड कप 2026 स्पर्धेचा श्रीगणेशा 12 जूनपासून होणार आहे.
फिफा वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिल्या पर्वाचा थरार हा 96 वर्षांआधी 1930 साली रंगला होता.
तेव्हापासून आतापर्यंत यशस्वीपणे या स्पर्धेचं आयोजन करण्यात येत आहे. या निमित्ताने स्पर्धेत सर्वाधिक सामने जिंकणाऱ्या संघाबाबत जाणून घेऊयात.
ब्राझील टीमच्या नावावर फिफा वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक सामने जिंकण्याचा विक्रम आहे. ब्राझीलने सर्वाधिक 76 सामने जिंकले आहेत.
जर्मनी दुसऱ्या स्थानी आहे. जर्मनीने 68 सामने जिंकले आहेत. तर अर्जेंटीना 47 विजयांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.
इटलीने 45 आणि फ्रान्सने 39 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर इंग्लंडने 32 आणि स्पेनने 31 सामने जिंकले आहेत.
तसेच ब्राझील फिफा वर्ल्ड कप स्पर्धेतील प्रत्येक पर्वात खेळलेली एकमेव टीम आहे.