आयपीएलमध्ये वेगवान 3 हजार धावा करणारे  7 भारतीय फलंदाज, पहिल्या स्थानी कोण?

28 मार्च  2026

Created By:  संजय पाटील

आयपीएलमध्ये भारताकडून वेगवान 3 हजार धावांचा विक्रम ऋषभ पंत याच्या नावावर आहे. पंतने 2028 चेंडूत ही कामगिरी करुन दाखवली.

माजी ऑलराउंडर यूसुफ पठाण या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. युसूफने 2 हजार 82 चेंडूत 3 हजार धावा केल्या होत्या.

सूर्यकुमार यादव याने 2 हजार 130 चेंडूत 3 हजार टी 20I धावा पूर्ण केल्यात. 

मिस्टर आयपीएल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुरेश रैना याने  2 हजार 135 चेंडूत 3 हजार धावा केल्या होत्या.

महेंद्रसिंह धोनी याने 2 हजार 152 बॉलमध्ये 3 हजार धावा पूर्ण करण्याची कामगिरी केली होती.

त्यानंतर आता इशान किशन याचं या यादीत नाव जोडलं गेलं आहे. इशानने 2 हजार 180 बॉलमध्ये आयपीएलमधील 3 हजार धावा पूर्ण केल्यात.

दिल्ली कॅपिट्ल्सच्या  केएल राहुल याने आयपीएलमध्ये बंगळुरु, पंजाब आणि लखनौचं प्रतिनिधित्व केलं आहे. केएलने 2 हजार 203 बॉलमध्ये 3 हजार धावा पूर्ण केल्या आहेत.