फिफा वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील सर्वात युवा फुटबॉलपटूचं नाव माहित आहे? जाणून घ्या

9 जून 2026

Created By:  संजय पाटील

गिलबर्टो मोरा हा फिफा वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील सर्वात युवा फुटबॉलपटू असणार आहे. गिलबर्टो 17 वर्षांचा आहे. 

गिलबर्टो फिफा वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत मॅक्सिकोचं प्रतिनिधित्व करणार आहे.

गिलबर्टोने 2025 मध्ये वयाच्या 16 व्या वर्षी मॅक्सिकोसाठी गोल्ड कपमधून पदार्पण केलं होतं.

मॅक्सिकोकडे फिफा वर्ल्ड कप 2026 स्पर्धेचं यजमानपद आहे. मॅक्सिकोसह कॅनडा आणि अमेरिकेकडेही यजमानपद आहे.

तर क्रेग गॉर्डन हा फिफा वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील सर्वात वयस्कर खेळाडू असणार आहे.

फिफा वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत एकूण 1248 खेळाडू सहभागी होणार आहेत. 

दरम्यान फिफा वर्ल्ड कप स्पर्धेला 11 जूनपासून सुरुवात होणार आहे. वर्ल्ड कप स्पर्धेचं हे 23 वं पर्व असणार आहे.