संसारातील त्रास कमी करणाऱ्या 3 गोष्टी, चाणक्यांचे प्रभावी विचार

05 मे 2026

Created By:  Soneshwar Patil

प्राचीन भारतातील महान विचारवंत आचार्य चाणक्य यांच्या शिकवणी आजही जीवनाला योग्य दिशा देणाऱ्या मानल्या जातात.

त्यांनी राजकारण, अर्थशास्त्रासोबतच कुटुंब, यश, नोकरी आणि मैत्री यांसारख्या विषयांवरही सखोल मार्गदर्शन केले आहे.

त्यांच्या काही महत्त्वाच्या श्लोकांमधून जीवनातील यशाचे सूत्र स्पष्ट होते. चाणक्य सांगतात की, चांगल्या लोकांच्या सहवासामुळे व्यक्तीचा विकास होतो आणि योग्य दिशा मिळते.

तसेच, शरीर निरोगी असताना चांगली कामे करून घ्यावीत, कारण वेळ निघून गेल्यावर संधी मिळत नाही.

विद्येला त्यांनी ‘कामधेनू’सारखे अमूल्य मानले असून ती कोणत्याही परिस्थितीत उपयोगी पडते, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

शास्त्रांचे योग्य अध्ययन केल्यास व्यक्तीला योग्य-अयोग्य याची जाणीव होते आणि विवेक वाढतो. तसेच, जीवनातील दुःखांपासून दिलासा देणाऱ्या तीन गोष्टी म्हणजे कुटुंब, जीवनसाथी आणि सज्जनांची संगत असेही त्यांनी नमूद केले आहे.

डिस्क्लेमर: वरील माहिती सामान्य संदर्भावर आधारित असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.