इफ्तार करण्यापूर्वी 'वुज़ू' करणे आवश्यक असतं का?  इस्लाममधील 'हा' महत्त्वाचा विधी काय असतो?

3 मार्च 2025

Created By : मयुरी सर्जेराव

रमजान महिना सुरू आहे. मुस्लिम बांधव महिनाभर उपवास करतात.

रमजानमध्ये, मुस्लिम बांधव सकाळी सेहरी खातात आणि संध्याकाळी मगरिबच्या नमाजाच्या आधी इफ्तार करतात, म्हणजेच उपवास सोडतात.

काहींना असा प्रश्नही असतो की, इफ्तार करण्यापूर्वी 'वुज़ू' करणे आवश्यक असते का?

'वुज़ू' म्हणजे इस्लाममधील शुद्धीकरणाची धार्मिक पद्धत. पाण्याने हात, तोंड, नाक,पाय धुणे तसेच केसांवरून पाण्याचा हात फिरवणे

इस्लामिक विद्वान मुफ्ती सलाउद्दीन काझमी यांनी म्हटल्याप्रमाणे, उपवास सोडताना 'वुज़ू'  करणे आवश्यक नाही. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही करू शकता, पण  आवश्यक नाही.

जर तुम्ही इफ्तार नंतर लगेच नमाज अदा करणार असाल तर तुम्ही 'वुज़ू' करू शकता. परंतु उपवास सोडण्यापूर्वी 'वुज़ू'  करणे आवश्यक  नाही.

पण उपवास सोडण्यापूर्वी प्रार्थना करणे आवश्यक आहे. उपवास सोडण्यापूर्वी, दिवसभरात झालेल्या चुकांबद्दल माफी मागावी आणि नंतर उपवास सोडावा असंही त्यांनी सांगितलं आहे.