पितृपक्षात कावळ्यालाच का दिला जातो नैवेद्य?

28 सप्टेंबर  2026

Created By:  Purva Palande

पितृपक्षात कावळ्याला नैवेद्य देण्याची प्राचीन धार्मिक परंपरा आहे.

हिंदू धर्मातील मान्यतेनुसार कावळ्याला पितरांचा प्रतिनिधी मानले जाते.

त्यामुळे कावळ्याने नैवेद्य स्वीकारल्यास पितरांपर्यंत अन्न पोहोचल्याचे मानले जाते.

श्राद्धाच्या दिवशी कावळ्याला भात, पिंड किंवा इतर अन्न अर्पण केले जाते.

कावळा हा पूर्वजांकडून आलेल्या संदेशाचे प्रतीक मानला जातो.

या परंपरेमागे निसर्गातील प्राण्यांना अन्न देण्याची भावनाही जोडलेली आहे

त्यामुळे पितृपक्षात कावळ्याला नैवेद्य देण्याची प्रथा आजही अनेक कुटुंबांत श्रद्धेने पाळली जाते.