कपाळावर चंदनाचा टिळा लावल्याने काय होते?

9  February 2025

Created By : मयुरी सर्जेराव

टिळा हे हिंदू संस्कृतीचा एक भाग आहेत.

हिंदू धर्मात कोणताही सण किंवा धार्मिक कार्यक्रम कुंकाचा टिळा लावलाच जातो.

पूजेदरम्यान देव-देवतांना अष्टगंध, किंवा कुंकाचा गंध लावला जातो.

योगी आणि संत देखील नेहमी त्यांच्या कपाळावर टिळक किंवा गंध लावतात.

पण कपाळावर चंदनाचा टिळा लावल्याने विशेष फायदे होतात.

कपाळाच्या मध्यभागी चंदनाचा टिळा लावल्याने कपाळावरील सातही चक्रे नियंत्रित राहतात.

जो व्यक्ती कपाळावर चंदनाचा टिळा लावतो त्याच्या घरात अन्न आणि पैशाची कमतरता नसते.

चंदनाला एक सुखदायक सुगंध असतो. कपाळावर चंदनाचा टिळा लावल्याने चिंता आणि ताण कमी होतो. मानसिक एकाग्रता वाढते

कपाळावर चंदनाचा टिळा लावल्याने त्वचा आणि शरीर थंड राहते. हे अध्यात्म आणि भक्तीचे प्रतीक देखील मानले जाते.

कपाळावर चंदनाचा टिळा लावल्याने नकारात्मक ऊर्जा आणि वाईट शक्तींपासून संरक्षण होते. तसेच, व्यक्तीच्या मनात आणि शरीरात सकारात्मक ऊर्जा येते.

डिस्क्लेमर : ही माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलीआहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही