संध्याकाळी शिवलिंगावर जल अर्पण का करू नये?

17 July 2025

Created By: मयुरी सर्जेराव

संध्याकाळी शिवलिंगावर पाणी अर्पण करू नये असं म्हटले जाते

धार्मिक श्रद्धेनुसार सूर्यास्तानंतर शिवलिंगावर पाणी अर्पण करणे अशुभ मानले जाते

हिंदू पुराणानुसार, सूर्यास्तानंतर शिवलिंगावर मंत्र जपल्याशिवाय किंवा दिवा लावल्याशिवाय पाणी अर्पण करू नये

कारण हा काळ भगवान शिवाचा विश्रांतीचा काळ मानला जातो.

कोणत्याही पूजेमध्ये सूर्य देवाचे साक्षीदार असणे शुभ मानले जाते, त्यामुळे संध्याकाळी शिवलिंगाला पाणी अर्पण करण्यास मनाई असते

याशिवाय, अमावस्येच्या दिवशीही शिवलिंगावर पाणी अर्पण करू नये

अमावस्येच्या दिवशी चंद्रदेव दिसत नाहीत आणि ते अंधाराचे प्रतीक मानले जाते.

( डिस्क्लेमर : ही माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही, अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)