ऋषभ पंतच्या बहिणीच्या लग्नात धोनीचा 'दमादम मस्त कलंदर'वर भन्नाट डान्स  

13 मार्च 2025

Created By : मयुरी सर्जेराव

ऋषभ पंतची बहीण साक्षी पंतच्या लग्नासाठी एमएस धोनी त्याच्या पत्नीसह मसूरीला पोहोचला होता

धोनी व्यतिरिक्त, सुरेश रैना आणि पृथ्वी शॉ सारखे प्रसिद्ध क्रिकेटपटू देखील या कार्यक्रमाचा भाग बनले होते

ऋषभ पंतच्या बहिणीचे लग्न 12 मार्च रोजी होते. लग्नाच्या पार्टीतील धोनीच्या डान्सने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं

पंतच्या बहिणीच्या लग्न समारंभात धोनी 'दमादम मस्त कलंदर' गाण्यावर नाचताना दिसला

धोनीसोबत रैना आणि पंत यांनीही नृत्य केले, ज्याचा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे.

ऋषभ पंतच्या बहिणीचे लग्न अंकित चौधरीशी झाले आहे. दोघांचेही गेल्या वर्षी साखरपुडा झाला होता, तेव्हाही धोनी कार्यक्रमात उपस्थित होता