Sara Tendulkar : सारा तेंडुलकर प्रेमात पडली ? थेट नाव घेत म्हणाली..

17 May 2025

Created By : Manasi Mande

क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरची लाडकी लेक सारा सोशल मिडीयावर खूप ॲक्टिव्ह असते.

सध्या ती सुट्टीसाठी ऑस्ट्रेलियाला गेली आहे, तिथले फोटो तिने शेअर केलेत.

एक उंच इमारतीवरून तिने सूर्यास्ताचा नजाराही पोस्ट केलाय.

दुसऱ्या फोटोत ती माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटर मॅथ्यू हेडनची लेक ग्रेससोबत दिसत्ये.

साराच्या एका कॅप्शनने सर्वांचे लक्ष वेधले, ब्रिस्बेन तू माझं  हृदय जिंकलंस. मी या शहराच्या प्रेमात पडले आहे.

साराला ब्रिस्बेन शहर खूपच आवडलंय.

ती व्हिजीट ब्रिस्बेन ती ब्रँड अँबेसेडर आहे, गेल्या वर्षी सारा भारत वि. ऑस्ट्रेलिया टेस्ट मॅचदरम्यान गाबा स्टेडियमवर दिसली होती.

 काही दिवसांपूर्वी ती मॅथ्यू हेडनची लेक ग्रेस हिच्यासोबत लाँग ड्राइव्हलाही गेली होती.

सारा बरेच फोटो पोस्ट करत असते, सोशल मीडियावर तिचे लाखो चाहते आहेत.