Sophie Shine : शिखर धवनची गर्लफ्रेंड सोफी आहे तरी कोण, करते काय ?
2 May 2025
Created By : Manasi Mande
टीम इंडियाचा माजी खेळाडू शिखर धवनने अखेर सोफी शाईनसोबतचं त्याचं नातं जाहीररित्या कबूल केलं.
माझं प्रेम- असं लिहीत सोफी आणि शिखरने इन्स्टाग्रामवर एकमेकांसोबतचा फोटो शेअर केला.
पण शिखरची ही नवी गर्लफ्रेंड सोफी आहे तरी कोण ? ती काय करते ? त्यांची मैत्री कधी झाली ?
सोफी शाईन आयर्लंडची रहिवासी असून ती प्रॉडक्ट कन्सलटंट आहे. ती सध्या अबू धाबी नॉर्दर्न ट्रस्ट कॉर्पोरेशनची सेकंड व्हाईस प्रेसिडेंट आहे.
सोफी आणि धवनची मैत्री 2023 साली झाल्याचं बोललं जातं. इन्स्टाग्रामवर सोफीने केलेल्या एका पोस्टवर शिखर धवनने रिॲक्शनही दिली होती.
2023 आणि 2024 च्या आयपीएल सीझनमध्ये पंजाबच्या मॅचेसदरम्यान सोफी अनेकदा स्टेडियममध्ये दिसली होती.
मात्र यावर्षी पहिल्यांदाच चॅम्पियन्स ट्रॉफीदरम्यान जगाची नजर एकत्र बसलेल्या सोफी आणि शिखर धवनवर पडली आणि त्यांच्याबद्दल चर्चांना उधाण आलं.
नुकती सोफी ही शिखरच्या घरीही दिसली होती. अखेर काल दोघांनी एकमेकांसोबतचं नातं कबूल केलं.
Virat Kohli : हिंदी, पंजाबी, इंग्लिशही नाही.. मग विराट कोहलीचं आवडतं गाणं कोणतं ?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा