युवराज सिंग पेन्शनपेक्षा 'या' गोष्टीतून मिळवतोय बक्कळ पैसा
4 मार्च 2025
Created By : मयुरी सर्जेराव
2019 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही, युवराज सिंग त्याच्या मालमत्ता आणि व्यवसायांमधून बक्कळ पैसा कमवत आहे
युवराज सिंगचा गोव्यात समुद्रकिनारी एक आलिशान व्हिला आहे, जो तो पर्यटकांना तो भाड्याने दिला जातो. हा व्हिला त्याच्या सौंदर्य आणि सुविधांसाठी प्रसिद्ध आहे.
वरळीतील'ओमकार 1973' टॉवरमध्ये युवराजचे 2 अपार्टमेंट आहेत, त्यापैकी एकाची किंमत सुमारे 64 कोटी रुपये आहे. हे अपार्टमेंट देखील त्याने भाड्यानं दिले असून तो चांगले उत्पन्न मिळवत आहे.
चंदीगडमध्ये त्याचा दुमजली घर आहे. त्याच्या मालमत्तेचा एक भाग आहे, जो त्यांच्या एकूण संपत्तीमध्ये योगदान देतो.
या मालमत्तांमधून मिळणारे भाडे हे युवराज सिंगसाठी एक स्थिर आणि महत्त्वाचे उत्पन्नाचे स्रोत आहे, जे त्याला पेन्शनपेक्षा जास्त उत्पन्न देते.
मालमत्तेव्यतिरिक्त, युवराज सिंग 'YouWeCan' फाउंडेशन आणि इतर व्यावसायिक उपक्रमांमधूनही पैसे मिळवतोय. त्यामुळे त्याच्या संपत्तीत वाढ होतच चालली आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, युवराज सिंगची एकूण संपत्ती सुमारे 291 कोटी आहे, ज्यामध्ये त्याच्या मालमत्तेतून मिळणारे उत्पन्न महत्त्वाचे योगदान देते