21 फेब्रुवारी 2026
Created By: संजय पाटील
IRCTCने ऑनलाईन तत्काळ तिकीट बुकिंगसाठी आधार व्हेरीफीकेशन बंधनकारक केलं आहे. त्यामुळे आता आधार व्हेरीफीकेशन नसल्यास तिकीट बूक करता येणार नाही.
आधार व्हेरीफीकेशनमुळे सामान्य प्रवाशांना फायदा होईल, असा दावा IRCTC चा आहे. तसेच व्हेरीफीकेशनमुळे तत्काळ-आगाऊ आरक्षण सोपं होतं.
आगाऊ आरक्षण सुरु होताच आधार व्हेरीफीकेशन असलेल्या यूझर्सलाच तिकीट बूक करण्याची परवानगी मिळेल.
तसेच आधार व्हेरीफाइड यूझर्सलाच तत्काळ तिकीट बूक करता येईल. त्यामुळे भ्रष्टाचाराला आळा बसेल.
आयआरसीटीसीनुसार, आधार व्हेरीफीकेशन बंधनकारक केल्याने फेक यूझर्सला आळा बसेल.
ऑनलाईन तिकीट बूक करताना गैरसौय होऊ नये यासाठी आयआरसीटीकडून वेबसाईट-एपमध्ये आवश्यक बदल करण्यात आले आहेत.
वेबसाईट-एपमध्ये बदल केल्याने यूझर्सला तिकीट बूक करणं आणखी सोपं झालंय. तसेच रेल कनेक्ट App द्वारे तिकीट बूक करणं सोयीचं झालंय.
यूझर्सला या app वर अकाउंट व्हेरीफाय करावं लागेल. तसेच यूझर्सला बायोमॅट्रिक लॉगिनचा पर्याय उपलब्ध आहे.
आयआरसीटीसीने 2025 वर्षात 3 कोटींपेक्षा संशयित खाती आणि 12819 इमेल आयडी ब्लॉक केल्या आहेत.