22 एप्रिल 2026
Created By: संजय पाटील
WhatsApp हॅक होऊ नये याची भीती कायमच असते. युझर्सचा डेटा सुरक्षित रहावा यासाठी WhatsAppकडून नवनवीन फिचर्स आणले जातात.
WhatsApp कडून युझर्सचं खातं सुरक्षित रहावं यासाठी उपलब्ध असलेल्या खास फिचर्सबाबत जाणून घेऊयात.
फिचर्सचा वापर केल्यास तुमचं खातं हॅक होण्याची शक्यता कमी होते. (2 Step Verification) लॉगिन केल्यास समोरील व्यक्तीला तुम्ही तयार केलेला 6 अंकी पासवर्ड टाकावा लागेल.
तुम्ही WhatsApp प्रमाणे Chat Lock चा वापर करुन चॅट्सला पासवर्ड लाऊ शकता, त्यामुळे कुणीही तुमच्या नकळत चॅट वाचू शकणार नाही.
Disapperaing Messages फिचर्सचा वापर केल्यास तुम्ही केलेले चॅट 24 तास, 1 आठवडा आणि किंवा 90 दिवसांत आपोआप डिलिट होतील.
Privacy Settings Control या फिचर्सचा वापर करुन तुम्ही तुमचा डीपी, स्टेट्स आणि लास्ट सीन कोण पाहून शकतो आणि कोण नाही? हे ठरवु शकता.
Fingerprint Lock या फिचर्सचा वापर केल्यास संभाव्य धोका टळतो. मोबाईल कुणाच्याही हातात गेल्यास तुमची प्रायव्हसी कायम राहते.