5 फेब्रुवारी 2026
Created By: संजय पाटील
पाठवण्यात आलेला मेसेज एअरप्लेन मोड ऑन करुन वाचा, असं केल्याने पाठवणाऱ्याला मेसेज वाचलाय, हे कळणार नाही.
WhatsApp न उघडता तुम्ही नोटिफिकेशन बारद्वारे रिप्लाय करु शकतो, ज्यामुळे तुमचा वेळ वाचेल.
कस्टम नोटिफिकेशनद्वारे तुम्हाला कुणी मेसेज केलाय हे पटकण समजू शकतं. मात्र त्यासाठी कस्टम नोटिफिकेशन सेट करावी लागेल, असं केल्याने मेसेज मिस होणार नाही.
WhatsApp सुरक्षित रहावं यासाठी फिंगरप्रिंट लॉक सेट करु शकता.
कोणताही मेसेज लवकर शोधायचा असेल तर तो स्टार करा. जो मेसेज स्टार करायचाय तो जोरात पूश करा आणि त्यानंतर स्टार चिन्हावर क्लिक करा. नंतर तुम्हाला हा मेसेज स्टार मेसेजमध्ये मिळेल.
लॅपटॉपवर WhatsApp वेबद्वारे चॅट करु शकता. त्यासाठी app ओपन केल्यानंतर WhatsApp web वर मोबाईलद्वारे क्यूआर कोड स्कॅन करा.
WhatsApp च्या या व्यतिरिक्त अशा अनेक सोप्या ट्रिक्स आहेत, ज्यामुळे यूझर्सचा बराच वेळ वाचू शकतो.