20 फेब्रुवारी 2026
Created By: संजय पाटील
व्हॉट्सअॅप या मेसेजिंग App चा फक्त भारतातच नाही तर जगभरात मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. कंपनीकडून वारंवार या अॅपमध्ये आवश्यक बदल केले जातात.
व्हॉट्सअॅपकडून शुक्रवारी नव्या फिचरची घोषणा करण्यात आली. ग्रुप मेसेज हिस्ट्रिी असं या फिचरला नाव देण्यात आलं आहे.
या फिचरमुळे व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये नव्याने जोडण्यात आलेल्या सदस्याला आधीचेही मेसेज दिसतील. त्यामुळे त्या सदस्याला त्याआधी ग्रुपमध्ये काय चर्चा झालीय हे सहज समजेल.
हा फिचर आणताना युझर्सच्या एन्ड टु एन्ड एनक्रिप्शनबाबत पूर्ण खबरदारी घेतल्याचं कंपनीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
ग्रुपमधील नव्या सदस्याला जुने मेसेज दिसणार की नाहीत? हे ठरवण्याचा अधिकार व्हॉट्सअॅप अॅडमीनला दिला आहे. अॅडमीन सेटिंगनुसार हे बदल करु शकतो.
व्हॉट्सअॅपकडून ब्लॉगद्वारे या नव्या फिचरबाबतची माहिती देण्यात आली आहे.
याआधी सदस्याला ग्रुपमध्ये जोडल्यानंतर त्याला त्यानंतरचे मेसेज दिसायचे. मात्र आता संबंधित सदस्याला आधीचे मेसेजही पाहायला मिळतील.
व्हॉट्सअॅपचं हे नवं फिचर पूर्णपणे ऑप्शनल आहे तसेच यात बदल करता येऊ शकतो.