उन्हाळ्यात आयफेल टॉवरचा आकार खरंच वाढतो का?

21 May 2025

Created By: मयुरी सर्जेराव

 उन्हाळ्यात पॅरिसमधील आयफेल टॉवरचा आकार खरंच वाढतो असं म्हटलं जातं

उन्हाळ्यात हा मनोरा सुमारे 6 इंच किंवा 15 सेंटीमीटरने उंच होतो

उन्हाळ्यात या टॉवरचा आकार जसा वाढतो तसाच हिवाळ्यात त्याचा आकार कमी होतो

आयफेल टॉवर लोखंडापासून बनलेला आहे आणि उष्णतेच्या संपर्कात आल्यावर धातूंचा विस्तार होतो. या प्रक्रियेला थर्मल एक्सपेंशन म्हणतात

यामुळे, उन्हाळ्यात आयफेल टॉवरचे आकारमान वाढते आणि टॉवर काही सेंटीमीटरने उंच होतो

दरवर्षी लाखो लोक आयफेल टॉवर पाहण्यासाठी येतात. ते बनवण्यासाठी सुमारे 800 दिवस लागले होते

या टॉवरमध्ये 18,038 लोखंडी भाग आणि सुमारे 25 लाख खिळे आहेत

31 मार्च 1889 रोजी पॅरिस वर्ल्ड फेअरसाठी जेव्हा त्याचे उद्घाटन करण्यात आलं तेव्हा 300 मीटर असलेल्या आयफेल टॉवरची उंची 312 मीटर होती