08 ऑक्टोबर 2026
Created By: Bhakti Gothankar
महाराष्ट्रातील हा किल्ला फक्त ट्रेकर्सचा उगाच आवडता किल्ला नाही, कारण इथे इतिहास, निसर्ग आणि थरार तिन्ही गोष्टी उंचीवर पाहायला मिळतात. तब्बल 1,422 मी. उंचीवर असलेला हा किल्ला जिथे इंद्रवज्र पाहण्याचा मन तृप्त करणारा अनुभव घेता येतो.
हरिश्चंद्र गड कालाचुरी राजवटीपासून सुरू झालेला हा किल्ला पुढे मुघल आणि मराठ्यांच्या राजवटीचाही साक्षीदार ठरला. महत्त्वाच्या व्यापारी मार्गांवर नियंत्रण ठेवण्यासाठी हा किल्ला लष्करी ठाणं म्हणूनही महत्त्वाचा होता.
कोकणकडा हरिश्चंद्र गडाची सर्वात खास ओळख म्हणजे कोकणकडा. अर्धगोलाकार आणि बाहेर झुकलेला हा कडा कोकणाचं सुंदर विहंगम दृश्य दाखवतो. पावसाळ्याच्या दिवसांत इथेच इंद्रवज्राचा अनुभव घेता येतो.
तारामती शिखर किल्ल्याच्या सर्वाच उंच भागावर असलेलं तारामती शिखर ट्रेकर्ससाठी खास आकर्षण आहे. हवामान स्वच्छ असल्यास इथून अलंग, मदन, कुलंग, कळसूबाई आणि अगदी काहीसे मुंबईचाही नजारा दिसतो
चार युगांची रहस्यमय कथा किल्ल्यावरील गुहेत शिवलिंग असून तिथे थंड पाण्याचा साठा आहे. गुहेतील चार खांब चार युगांचे प्रतीक मानले जातात. यापैकी आता एक खांब उरला आहे, तोही पडला तर कलियुगाचा अंत होणार असे मानलं जातं
ट्रेकर्ससाठी तीन वाटा तीन ट्रेकिंगचे मार्ग आहेत. खिरेश्वर मार्ग 7 किमीचा आणि तो पुर्ण करण्यासाठी 6-7 तास, पाचनाई मार्ग 3 किमीचाआहे आणि तुलनेने सोपा आहे. तसेच नळीची वाट चढताना घाम फुटतो हा मार्ग अनुभवी ट्रेकर्ससाठीच योग्य आहे.
पावसाळ्यात वेगळाच थरार जून ते सप्टेंबर दरम्यान किल्ल्यावर धबधबे, धुकं आणि हिरवाई पाहायला मिळते. मात्र याच काळात वाटा निसरड्या आणि कठीण असतात.
हरिश्चंद्र गड का खास आहे इतिहास, पुराणकथा, शिवमंदिर, कोकणकडा, तारामती शिखर आणि थरारक ट्रेकिंग मार्गांमुळे हरिश्चंद्र गडाची एक खास ओळख आहे. ट्रेकिंगची आवड असणाऱ्यांसाठी हा किल्ला म्हणजे साहस आणि निसर्गाचा भन्नाट अनुभव आहे.