‘दीदी’चा देसी जुगाड पाहून लोक थक्क! दागिने लपवण्यासाठी शोधली अशी भन्नाट जागा

24 सप्टेंबर  2026

Created By:  Purva Palande

एका महिलेचा दागिने लपवण्याचा अनोखा जुगाड सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

महिलेने घरातील फरशी पुसण्याच्या वायपरमध्ये सोन्याचे दागिने लपवण्याची पद्धत दाखवली.

सर्वप्रथम ती वायपरला जोडलेले प्लास्टिकचे पाईप काढते.

यानंतर वायपरच्या पोकळ भागात सोन्याची चेन लपवते.

गृहस्वच्छतेच्या वस्तूमध्ये दागिने असल्याने चोरांना ते सहज सापडणार नाहीत, असा तिचा दावा आहे.

हा हॅक पाहून अनेकांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.