या हिरव्या डोळ्यांच्या गोंडस चिमुकलीच्या स्माइलवर नेटकरी फिदा, पाकिस्तानशी काय संबध?

7 May 2025

Created By: मयुरी सर्जेराव

सोशल मीडियावर एका चिमुकलीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे

या चिमुकलीचे डोळे हिरव्या रंगाचे असून तिच्या निरागस हास्याने सर्वांचे मन जिंकले आहे

ही मुलगी अफगाणिस्तान सीमेवरील तोरखम सीमेवर राहणारी आहे

 ती पश्तून समुदायातील असून तिच्या कुटुंबीयांना पाकिस्तानातून जबरदस्तीने परत पाठवण्यात आलं

फोटोग्राफर मोहम्मद उस्मान अजीजी यांनी या मुलीचे हास्य टिपले आहे. त्यांनी हा व्हिडिओ देखील शेअर केला आहे

मोहम्मद उस्मान अजीजी यांनी या मुलीचे नाव 'मुस्कान' ठेवून तिच्या निरागसतेला नवीन ओळख दिली आहे.

@mohosmanazizi या इंस्टाग्राम हँडलवरून शेअर केलेला हा व्हिडिओ आतापर्यंत 4 कोटींहून अधिक वेळा पाहिला गेला