मुकेश अंबानी रात्री 2 वाजेपर्यंत काय करत असतात? लेकानेच केला खुलासा
3 मार्च 2025
Created By : मयुरी सर्जेराव
रिलायन्स जिओ इन्फोकॉमचा अध्यक्ष आकाश अंबानीने एका मुलाखतीत वडील मुकेश अंबानींबद्दल एक गोष्ट सांगितली
आकाशने सांगितलं की मुकेश अंबानी रोज रात्री 2 वाजेपर्यंत का जागे असतात?
आकाशने म्हटलं की, "माझं कुटुंब ही माझी प्रेरणा आहे. आम्ही सर्वजण 32 वर्षांपासून एकाच छताखाली राहतोय, विशेषतः माझ्या दोन्ही पालकांकडून खूप शिकलो"
मुकेश अंबानी यांच्याबद्दल आकाशने सांगितलं की उद्योगात इतके वर्ष घालवल्यानंतरही, मुकेश अंबानी रात्री 2 वाजेपर्यंत प्रत्येक ईमेलला उत्तर देत असतात
तो म्हणाला, 'आजही माझे वडील त्यांना पाठवलेल्या प्रत्येक ईमेलला उत्तर देतात आणि ते रात्री 2 वाजेपर्यंत त्यासाठी जागे असतात. त्यांच्या याच कामातून आम्हाला प्रेरणा मिळते"
आई नीता अंबानींबद्दल बोलताना आकाशने म्हटलं "माझी आई देखील माझ्या वडिलांसारखीच आहे. सर्व कामांबद्दल तत्पर"
मुलाखतीत आकाशला विचारण्यात आलं की त्याला सकाळी 8 ते संध्याकाळी 5 किंवा संध्याकाळी 5 ते सकाळी 8 पर्यंत काम करायला आवडेल का?
यावर आकाशने उत्तर दिलं की, त्याचे काम 12 तासांपेक्षा खूप जास्त आहे आणि त्याच्या व्यस्त वेळापत्रकात त्याला साथ देणाऱ्या त्याची पत्नी श्लोका मेहताचेही त्याने आभार मानले