23 सप्टेंबरलाच दिवस-रात्र समान का असतात? जाणून घ्या रहस्य!

23 सप्टेंबर  2026

Created By:  Purva Palande

23  सप्टेंबरच्या आसपास दिवस आणि रात्र जवळपास समान असतात,  याला Equinox म्हणतात.

Equinox म्हणजे दिवस आणि रात्र जवळपास समान लांबीचे होण्याची खगोलीय घटना.

पृथ्वी आपल्या अक्षावर सुमारे 23.5 अंश झुकलेली आहे.

या काळात सूर्याची किरणे विषुववृत्तावर जवळपास थेट पडतात.

त्यामुळे पृथ्वीच्या दोन्ही गोलार्धांना जवळपास समान सूर्यप्रकाश मिळतो.

यामुळे दिवस आणि रात्रीची लांबी जवळपास समान होते.

त्यानंतर उत्तर गोलार्धात हळूहळू रात्री मोठ्या आणि दिवस छोटे होऊ लागतात.