रेल्वे स्टेशनचे बोर्ड पिवळे का असतात?

22  सप्टेंबर  2026

Created By:  Purva Palande

रेल्वे स्टेशनचे नाव पिवळ्या रंगाच्या बोर्डवर काळ्या अक्षरात लिहिलेले असते.

पिवळा रंग लांबूनही सहज आणि स्पष्ट दिसतो.

ट्रेन वेगात असतानाही लोको पायलटला हा बोर्ड पटकन दिसतो.

पिवळ्या आणि काळ्या रंगाचा कॉम्बिनेशन नाव वाचण्यासाठी अधिक स्पष्ट असतो.

पाऊस, धुके किंवा कमी प्रकाशातही पिवळा रंग तुलनेने उठून दिसतो.

पिवळा रंग लक्ष वेधून घेत असल्याने प्रवासी आणि लोको पायलट दोघांचेही बोर्डकडे लक्ष जाते.

त्यामुळे संपूर्ण देशातील स्टेशनच्या बोर्डांना पिवळा रंग देऊन एकसारखी ओळख निर्माण करण्यात आली आहे.