व्हॉट्सॲपचे हे 5 फीचर्स वापरले आहेत का? नक्कीच कामी येतील

22 सप्टेंबर  2026

Created By:  Purva Palande

व्हॉट्सॲप अकाउंट आणि वैयक्तिक डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी काही महत्त्वाचे फीचर्स वापरणे गरजेचे आहे.

टू-स्टेप-वेरिफिकेशन सुरू केल्यास अकाउंट लॉग-इन करताना 6 अंकी PIN आवश्यक असतो.

चॅट लॉक फीचरच्या मदतीने तुम्ही खासगी चॅट्स लॉक करून सुरक्षित ठेवू शकता.

डिसअपीअरिंग मेसेजेस फीचरमुळे मेसेज 24 तास, 7 दिवस किंवा 90 दिवसांनी आपोआप डिलीट होतात.

प्रायव्हसी सेटिंग मधून तुमचा फोटो, लास्ट सीन आणि स्टेटस कोण पाहू शकतो हे नियंत्रित करता येते.