निफाडमध्ये थंडीचा कहर, द्राक्षबागांचं नुकसान

| Updated on: Jul 05, 2019 | 4:43 PM

नाशिक : हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर या राज्यांमध्ये बर्फवृष्टी होत आहे. त्यामुळे उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे या थंडीच्या हंगामात तिसऱ्यांदा कडाक्याने थंडीचे जोरदार आगमन होत किमान तापमानाचा पारा पाच अंश सेल्सिअस पेक्षाही कमी झालाय. या कडाक्याच्या थंडीने सर्वाधिक झळ द्राक्षांची पंढरी म्हणून ओळख असलेल्या निफाड तालुक्यातील द्राक्ष बागांना बसली आहे. या थंडीने 1500 ते 2000 कोटी […]

निफाडमध्ये थंडीचा कहर, द्राक्षबागांचं नुकसान
Follow us on

नाशिक : हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर या राज्यांमध्ये बर्फवृष्टी होत आहे. त्यामुळे उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे या थंडीच्या हंगामात तिसऱ्यांदा कडाक्याने थंडीचे जोरदार आगमन होत किमान तापमानाचा पारा पाच अंश सेल्सिअस पेक्षाही कमी झालाय. या कडाक्याच्या थंडीने सर्वाधिक झळ द्राक्षांची पंढरी म्हणून ओळख असलेल्या निफाड तालुक्यातील द्राक्ष बागांना बसली आहे. या थंडीने 1500 ते 2000 कोटी रुपयांचं द्राक्षांचं नुकसान होणार आहे. निफाड तालुक्यातील कसबे सुकेणा 2.5 अंश सेल्सिअस, शिवडी 3.3 अंश सेल्सिअस, सारोळे खुर्द 3 अंश सेल्सिअस तर कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रात 5 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे.

गेल्या दहा डिसेंबरपासून उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे नाशिक जिल्ह्याचा कॅलिफोर्निया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निफाड तालुका गारठलाय. ठिकठिकाणी शेकोट्या पेटवून नागरिक उब मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. या कडाक्याच्या थंडीचा मानवी जीवनाबरोबर शेतीवरही चांगला-वाईट परिणाम होताना दिसत आहे.

गहू, हरभरा या पिकांना फायदा होतो, तर द्राक्षांवर याचा परिणाम होत नुकसान होत आहे. या थंडीच्या हगामातील निचांकी तापमानाची नोंद 30 डिसेंबर रोजी निफाड तालुक्यातील उगाव आणि कसबे सुकेणा या गावात 0 अंश सेल्सिअस, सारोळे येथे 1 अंश सेल्सिअस तर कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रात 1.8 सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली होती. 27 डिसेंबरपासून ते दोन जानेवारी परंतु 5 दिवस सलग किमान तापमान पाच अंश सेल्सिअसच्या खाली राहिल्याने तसेच गेल्या तीन दिवसांपासून पुन्हा थंडीत वाढ होत पारा पाच अंश सेल्सिअसच्या खाली गेल्याने, नाशिकच्या द्राक्षांसह मिरचीलाही मोठा फटका बसताना दिसत आहे.

वाढत्या थंडीमुळे तसेच सध्‍या इराण, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान या देशांकडून येणाऱ्या बाष्पामुळे द्राक्षबागांवर हिमकण गोठले आहेत. 12 ते 15 मिलिमीटर आकार तयार झालेले मणी भाजल्यागत झाल्याने याचा परिणाम म्हणून दोन लाख एकरापर्यंत पोहोचलेले नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष बागांचे क्षेत्र धोक्यात येत 15 ते 20 टक्के नुकसान होणार आहे. त्याचा फटका 1500 ते 2000 कोटी रुपयांची नुकसान होण्याचा प्राथमिक अंदाज द्राक्ष उत्पादक संघाचे सदस्य कैलास भोसले यांनी व्यक्त केला आहे. या नुकसानीमुळे आर्थिक संकटात सापडत द्राक्ष उत्पादक शेतकरी आणखी कर्जाच्या खाईत जाण्याची भीती व्यक्त केली आहे.

थंडीचा द्राक्षबागेवर परिणाम कसा होतो?

सूर्यकिरणांच्या सहाय्याने पानांमधून होणारी अन्न तयार करण्याची प्रक्रिया थंडीमुळे मंदावते

जमिनीतील तापमानात घसरण झाल्याने मुळांची सक्रियता कमी होऊन अन्न प्रक्रियेवर दुहेरी फटका बसतो

द्राक्ष बागांमधील पाने करपतात

फुलोऱ्यातून बाहेर पडून पाच मिलिमीटर आकाराच्या तयार झालेल्या मण्यांचा आकार दोन मिलिमीटर होण्याचा कालावधी तीन दिवसांवरून सहा दिवसांपर्यंत जातो

मण्यांमध्ये साखर उतरण्याचा कालावधी वाढणार

छाटणीनंतर 120 दिवसांनी द्राक्षाची होणारी काढणी 130 ते 145 दिवसांपर्यंत जाणार