विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे 'संघ' दक्ष; बैठकीत काय ठरलं?
RSS-BJP Meeting : लोकसभेतील हाराकिरीमुळे आता भाजपने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जुळवून घेतलं आहे. लोकसभा निवडणुकीत संघाशी फटकून वागल्याचा फटका बसल्याने विधानसभेसाठी भाजपने संघाबाबत सावध पवित्रा घेतला आहे. दोन्ही संघटनांमध्ये नुकतीच बैठक झाली, त्यात यावर चर्चा झाली.