AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

INDA vs PAKA : टीम इंडियाची महिला ब्रिगेड पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यासाठी सज्ज, सामना किती वाजता?

India A Women vs Pakistan A Women Live Streaming : राधा यादव हीच्या नेतृत्वात इंडिया ए टीम सलामीच्या सामन्यात उलटफेरची शिकार झाली. यूएईने भारताला पराभूत केलं. त्यामुळे टीम इंडियाला पाकिस्तान विरुद्ध कोणत्याही स्थितीत विजय मिळवावा लागणार आहे.

INDA vs PAKA : टीम इंडियाची महिला ब्रिगेड पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यासाठी सज्ज, सामना किती वाजता?
India A Women vs Pakistan A WomenImage Credit source: TV9 Bharatvarsh
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Feb 14, 2026 | 11:40 PM
Share

आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत रविवारी 15 फेब्रुवारीला एकूण 3 सामने होणार आहेत. दिवसातील तिसऱ्या आणि अंतिम सामन्याकडे साऱ्या क्रिकेट विश्वाचं लक्ष लागून आहे. या सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी भारत विरुद्ध पाकिस्तान आमनेसामने असणार आहेत. त्याआधी क्रिकेट चाहत्यांना आणखी एक भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याचा थरार पाहायला मिळणार आहे. बँकॉकमध्ये सध्या वूमन्स आशिया कप रायजिंग स्टार्स 2026 स्पर्धा खेळवण्यात येत आहे. या स्पर्धेत इंडिया ए विरुद्ध वूमन्स ए यांच्यात महामुकाबला होणार आहे. या सामन्याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.

दोन्ही संघांचा दुसरा सामना

इंडिया ए आणि पाकिस्तान ए या दोन्ही संघांचा या स्पर्धेतील दुसरा सामना असणार आहे. पाकिस्तानने या मोहिमेची सुरुवात विजयाने केली. पाकिस्तानने नेपाळवर 30 धावांनी मात करत विजयी सुरुवात केली होती. तर भारताला यूएईकडून पराभूत व्हावं लागलं. यूएईने इंडिया ए वूमन्स टीमवर 7 विकेट्सने एकतर्फी विजय मिळवला. त्यामुळे आता टीम इंडियासाठी दुसरा सामना फार अटीतटीचा झाला आहे. त्यामुळे कॅप्टन राधा यादव हीच्यासमोर भारताला विजयी करण्याचं आव्हान असणार आहे. तर दुसऱ्या बाजूला कर्णधार हाफसा खालीद हीचा पाकिस्तानला सलग दुसरा विजय मिळवून देण्याचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे हा सामना कोण जिंकतं याकडे चाहत्यांची करडी नजर असणार आहे.

इंडिया ए विरुद्ध पाकिस्तान ए सामना कधी?

इंडिया ए विरुद्ध पाकिस्तान ए सामना रविवारी 15 फेब्रुवारीला खेळवण्यात येणार आहे.

इंडिया ए विरुद्ध पाकिस्तान ए सामना कुठे?

इंडिया ए विरुद्ध पाकिस्तान ए सामना बँकॉकमधील टेर्डथाई क्रिकेट ग्राउंडमध्ये आयोजित करण्यात आला आहे.

इंडिया ए विरुद्ध पाकिस्तान ए सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

इंडिया ए विरुद्ध पाकिस्तान ए सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 12 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 12 वाजता टॉस होणार आहे.

इंडिया ए विरुद्ध पाकिस्तान ए सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?

इंडिया ए विरुद्ध पाकिस्तान ए सामना टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.

इंडिया ए विरुद्ध पाकिस्तान ए सामना मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?

इंडिया ए विरुद्ध पाकिस्तान ए सामना मोबाईलवर सोनी लिव्ह एपद्वारे लाईव्ह पाहायला मिळेल.

Follow Us
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात