AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Emraan Hashmi चे हे गाणी लिहिण्यास गीतकाराने दिलेला नकार,नंतर ठरले प्रचंड हीट, मोहम्मद रफींच्या ४६ वर्षे जुन्या गाण्याशी संबंध

अभिनेता इमरान हाशमी याचे सुरुवातीचे चित्रपट जरी बोल्ड असले तरी त्याची गाणी मात्र सर्व सुपरहिट झाली होती. असेच एका चित्रपटाचे गीत लिहिण्यास गीतकार समीर यांनी स्पष्ट नकार दिला होता. कारण होते मोहम्मद रफी साहेबांचे एक गीत....

Emraan Hashmi चे हे गाणी लिहिण्यास गीतकाराने दिलेला नकार,नंतर ठरले प्रचंड हीट, मोहम्मद रफींच्या ४६ वर्षे जुन्या गाण्याशी संबंध
imran hashmi Song story
| Updated on: Nov 19, 2026 | 10:52 PM
Share

गीतकार समीर अंजान (Sameer Anjaan) यांनी हिंदी सिनेमात अनेक सुंदर गाणी दिली आहे. त्यातील एक गाणे अभिनेता इमरान हाशमी याच्या चित्रपटासाठी होते. हे गाणे २१ वर्षांपासून लोकांच्या तोंडावर असते. हे गाणे जितके हीट झाले तितके ते यातील बोल्ड सीनमुळे चर्चेतही आले. त्यामुळे या गाण्यास तसे लोक चार चौघात ऐकत नाही. या गाण्याची एक वेगळीच कहाणी आहे, हे गाणे लिहिण्यास गीतकार समीर अंजान यांनी सुरुवातीला स्पष्ट नकार दिला होता. कोणते हे वादगस्त गीत ते पाहूयात…

इमरान हाश्मी याचा एक चित्रपट ‘आशिक बनाया आपने’ (Aashiq Banaya Aapne) गाजला होता. त्यातील बोल्ड सीनमुळेच तो अधिक गाजला होता. मात्र यातील गाणी मात्र कानाला ऐकायला सुंदर होती. या चित्रपटाचे टायटल ट्रॅक करण्यासाठी समीर अंजान यांनी नकार दिला होता. मात्र, हे गाणे नंतर साल २००५ चे सर्वाधिक ऐकले जाणारे गाणे बनले. या गाण्यामुळे संगितकार आणि गायक हिमेश रेशमिया (Himesh Reshammiya) याला इंडस्ट्रीत ओळख मिळाली.

समीर अंजान (Sameer Anjaan) यांनी का नकार दिला याची एक कहाणी आहे. या गाण्याचे गीत लिहिण्यास समीर यांनी नकार देण्यामागे त्यांचे म्हणणे होते की ४६ वर्षांपूर्वी मोहम्मद रफी (Mohammed Rafi) यांनी या गाण्याचे बोल वापरले होते.

‘मसाला चाय विथ राहुल महाजन’ पॉडकास्टमध्ये एकदा समीर अंजान यांनी सांगितले की जेव्हा हिमेश रेशमिया त्यांच्याजवळ चित्रपट ‘आशिक बनाया आपने’ लिहून घेण्यासाठी आले होते. तेव्हा त्यांनी गाणे लिहिण्यास साफ नकार दिला. त्याचे म्हणणे होते की आनंद बक्क्षी यांचे गाण्याचे बोल मी कसे काय वापरु ?

समीर अंजान म्हणाले की हे गाणी आनंद बक्क्षी यांनी लिहिलेले आहे आणि इतके लिजेंडरी गाणे आहे की मी त्यांच्या परवानगी विना शब्द कसे वापरणार. या गाण्याचे बोल होते की, ‘दर्द-ए-दिल दर्द-ए-जिगर दिल में जगाया आपने, पहले तो मैं शायर था, आशिक बनाया आपने’. या शेवटच्या ‘आशिक बनाया आपने’ या ओळीमुळे अडले होते.

हिमेश रेशमिया यांनी अखेर केले राजी

समीर अंजान यांचा नकार आल्यानंतरही हिमेश रेशमिया बधले नाहीत. त्यांनी चिंता करु नका मी तुम्हाला अशी ट्युन ( चाल ) देईल की ते गाणे आठवणारही नाही. नंतर हिमेशने आधी गाण्याची चाल लावली. आणि ही चाल समीर यांना ऐकवण्यात आली. त्यावेळी समीर आश्चर्यचकीत झाले. अखेर त्यांना या चालीवर हे गीत लिहिले.

कर्ज चित्रपटातील हे गीत आठवतंय

आनंद बक्क्षी यांचे आशिक बनाया गाणे १९८० मध्ये आलेला ऋषी कपूर यांचा प्रसिद्ध हिंदी चित्रपट ‘कर्ज’ याचे आहे. या गाण्याला गायक मोहम्मद रफी यांनी गायले असून ते आजही एक कल्ट क्लासिक गाणे म्हणून ओळखले जात आहे.

Follow Us
दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत आणखी 6 तालुक्यांची भर; कोणत्या....
Maharashtra Drought : दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत आणखी 6 तालुक्यांची भर; कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यांचा समावेश? व्हिडिओ बघाच 
दाऊद इब्राहिमच्या मुंबईतील घराच्या तोडक कारवाईला हायकोर्टाची स्थगिती..
Dawood Ibrahim : दाऊद इब्राहिमच्या मुंबईतील जुन्या घराच्या तोडक कारवाईला हायकोर्टाची स्थगिती; पुढील सुनावणी कधी?
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरुन मनोज जरागेंचा नवा दावा काय?
Manoj Jarange : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरुन मनोज जरागेंचा नवा दावा काय?
भाजप आमदार महेश बालदींना तीन वर्षांची कारावासाची शिक्षा; निकालानंतर...
Mahesh BaldI : भाजप आमदार महेश बालदींना तीन वर्षांची कारावासाची शिक्षा; मात्र निकालानंतर...
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर फडणवीस सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय काय?
Maharashtra Drought : आधी पाणी, मग सुशोभीकरण; दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर फडणवीस सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय
शिंदे सेनेला सोडचिठ्ठी, भाजपमध्ये प्रवेश! त्या बड्या नेत्याच्या पक्ष..
Shivsena : BJP : शिंदे सेनेला सोडचिठ्ठी, भाजपमध्ये प्रवेश! त्या बड्या नेत्याच्या पक्षबदलाने पालघरच्या राजकारणात खळबळ
शिंदेंचा प्रवासाचा प्लॅन बदलला; रस्तेमार्गे पुण्याकडे रवाना....
Eknath Shinde : हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, शिंदेंचा प्रवासाचा प्लॅन बदलला; पंढरपुरातून रस्तेमार्गे पुण्याकडे रवाना
शायना एन.सी. यांच्याविरोधात ठाकरे गटाच्या शिवसैनिकांचं आंदोलन...
Pune : बाळासाहेबांचा अवमान सहन करणार नाही...; शायना एन.सी. यांच्याविरोधात ठाकरे गटाच्या शिवसैनिकांचं आंदोलन
शिवसेना पक्ष, चिन्हासंदर्भात आजची सुनावणी संपली; पुढील सुनावणी कधी?
Shivsena Supreme Court Hearing : शिवसेना पक्ष, चिन्हासंदर्भात आजची सुनावणी संपली; पुढील सुनावणी कधी?
13 वर्षांची प्रतीक्षा संपली; GTA 6 लॉन्च होताच गेमिंग विश्वात धुमाकूळ
GTA 6 Launch : तब्बल 13 वर्षांची प्रतीक्षा संपली; GTA 6 लॉन्च होताच गेमिंग विश्वात धुमाकूळ