Osmanabad : गोगलगायीनंतर आता यलो मोजॅकचा प्रादुर्भाव, सोयाबीनवर संकटाची मालिका सुरुच

| Updated on: Aug 06, 2022 | 2:26 PM

खरीप हंगामातील पिकांची उगवणच होताच तब्बल महिनाभर पावसामध्ये सातत्य राहिले होते. त्यामुळे खरिपातील पिके ही पिवळी पडली आहेत. शेतकऱ्यांना मशागत आणि किटकनाशक फवारणीसाठी देखील वेळ मिळाला नाही. या दरम्यानच्या काळात सोयाबीनची वाढ सुरु असतानाच यलो मोजॅकचा प्रादुर्भाव वाढल्याने सोयाबीन पिवळे तर पडत आहे पण भविष्यात याला शेंगा देखील लागत नाहीत.

Osmanabad : गोगलगायीनंतर आता यलो मोजॅकचा प्रादुर्भाव, सोयाबीनवर संकटाची मालिका सुरुच
सोयाबीनवर यलो मोजॅकचा प्रादुर्भाव वाढत असल्याने उस्माबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकावर रोटावेटर घालून मोडणी केली आहे.
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

उस्मानाबाद : यंदाच्या (Kharif Season) खरीप हंगामातील पिकांना एक ना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. पेरणी झाली की लागून राहिलेल्या पावसामध्ये तब्बल महिनाभर सातत्य राहिले होते. त्यामुळे पिकांची वाढ तर खुंटलीच पण अनेक ठिकाणी दुबार पेरणीचे संकट ओढावले होते. (Soybean Crop) सोयाबीनची उगवण होताच त्यावर गोगलगायीचा प्रादुर्भाव झाला होता. उस्मानाबाद, बीड जिल्ह्यामध्ये उगवण झाली की लागलीच गोगलगायीने सोयाबीन फस्त केले होते. आता पिकाची वाढ होत असतानाच (Yellow Mosaic) यलो मोजॅक व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे पिके ही पिवळी पडत असून जागेवर वाळून जात आहे. सततच्या संकटाला त्रासून कळंब तालुक्यातील एकरुका येथील शेतकऱ्याने तर 5 एक्करावरील सोयाबीन मोडले आहे. उभ्या पिकात रामहरी घाडगे यांनी रोटर घालून सोयाबीन मोडून टाकल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे शेती करावी तरी कशी असा सवाल उपस्थित होत आहे.

यलो मोजॅक म्हणजे नेमके काय ?

खरीप हंगामातील पिकांची उगवणच होताच तब्बल महिनाभर पावसामध्ये सातत्य राहिले होते. त्यामुळे खरिपातील पिके ही पिवळी पडली आहेत. शेतकऱ्यांना मशागत आणि किटकनाशक फवारणीसाठी देखील वेळ मिळाला नाही. या दरम्यानच्या काळात सोयाबीनची वाढ सुरु असतानाच यलो मोजॅकचा प्रादुर्भाव वाढल्याने सोयाबीन पिवळे तर पडत आहे पण भविष्यात याला शेंगा देखील लागत नाहीत. त्यामुळे परिश्रम आणि पैसै वाया घालण्यापेक्षा सोयाबीन मोडून दुसरे पीक घेण्याच्या अनुषंगाने घाडगे यांनी हे पाऊल उचलले आहे.

खरिपावरील संकट कायम

उत्पादनाच्या दृष्टीने शेतकऱ्यांसाठी खरीप हंगामच महत्वाचा असतो. या हंगामावरील उत्पन्नावरच आर्थिक ताळमेळ घातला जातो. विशेष म्हणजे मराठवाड्यात सोयबीन हे हुकमी पीक असून दिवसेंदिवस या पिकाच्या क्षेत्रात वाढ होत आहे. सरासरी एवढा दर आणि उत्पादनाची हमी यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीनवरच भर दिला आहे. मात्र, गेल्या दोन वर्षापासून निसर्गाच्या लहरीपणाचा सर्वाधिक फटका खरीप हंगामाला बसत आहे. गतवर्षी परतीच्या पावसाने नुकसान झाले तर यंदा हंगामाच्या सुरवातीपासूनच नुकसानीची मालिका सुरु आहे.

5 एकरातील सोयाबीनवर रोटावेटर

रोटावेटरचा वापर शेतामधील तण काढून शेतजमिन तणविरहीत करण्यासाठी केला जातो. पण एकुरका येथील शेतकऱ्यांवर हे यंत्र सोयाबीन पिकावर फिरवण्याची वेळ आली आहे. तब्बल 5 एकरातील सोयाबीन हे पिवळे पडल्याने रामहरी घाडगे यांनी हे पाऊल उचलले आहे. सोयाबीनवर अधिकचा खर्च करण्यापेक्षा त्याला बाजूला सारुन इतर पिकाचे उत्पादन घेण्यावर त्यांनी भर दिला आहे.