Video: आली रे आली… हवेत उडणारी बाईक आली; ताशी 100 किलोमीटरचा स्पीड

| Updated on: Sep 18, 2022 | 11:48 PM

उडणाऱ्या कार नंतर आता जगात आता फ्लाइंग बाईक्सची निर्मिती होत आहे. ही बाईक दिसालया एखाद्या मोठ्या आकाराच्या ड्रोनसारखी आहे.

Video: आली रे आली... हवेत उडणारी बाईक आली; ताशी 100 किलोमीटरचा स्पीड
Follow us on

न्यूयॉर्क : रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात होणाऱ्या ट्रॅफिक जाममुळे वाहन चालक परेशान होतात. मात्र, या ट्रॅफीकच्या कटकटीतुन सुटका होणार आहे. कारण आता थेट हवेत उडणारी बाईक(flying bike ) आली आहे. ‘एरविन्स एक्सटुरिस्मो’ अमेरिकेतील डेट्रॉईट ऑटो शोमध्ये हवेत उडणाऱ्या बाईकची झलक पहायला मिळाली आहे.

उडणाऱ्या कार नंतर आता जगात आता फ्लाइंग बाईक्सची निर्मिती होत आहे. ही बाईक दिसालया एखाद्या मोठ्या आकाराच्या ड्रोनसारखी आहे.

हाय टेक्नॉलीजी आणि सेन्सर्सने ही बाईक बनवलेली आहे. ‘एरविन्स एक्सटुरिस्मो’ अमेरिकेतील डेट्रॉईट ऑटो शोमध्ये ही बाईक ठेवण्यात आली.

जपानची स्टार्टअप कंपनी एरविन्स टेक्नॉलॉजीने ही हॉवरबाईक बनवली आहे. ही बाइक पेट्रोलवर चालते. ताशी 100 किलोमीटरच्या स्पीडने ही बाईक उडते. 80 ते 100 किमी प्रतितास अशी या बाईकची वेग मर्यादा आहे.

ही बाईक एकावेळी 30 ते 40 मिनिटे हवेत उडवू शकता येवू शकते. रेड, ब्ल्यू आणि ब्लॅक या तीन स्टँडर्ट रंगात ही बाईक उपलब्ध आहे.
या बाईकचे वजन 300 किलो आहे. हवेत उडताना ही बाईक 100 किलो वजन पेलवू शकते. या हॉवरबाईकला कावासाकी हायब्रिड इंजिन आहे.

बाईक हवेत उडताना प्रचंड आवाज करते. यामुळे या बाईकला नॉइज रिड्यूसर जोडले जाणार आहेत. या बाईकची किंमत 7,77,000 डॉलर्स इतकी आहे. भारतीय चलनानुसार ही किंमत सुमारे 6 कोटी 20 लाख 32 हजार 183 रुपये इतकी होते.

भविष्यात ही उडणारी बाईक आणखी स्वस्त होईल असा दावा कंपनीच्या सीईओंनी केला आहे. 2023 पासून हॉवरबाईकचे छोटे व्हर्जन यूएसमध्ये विकले जाणार आहे. यानंतर बाईकच्या यशस्वी विक्रीनंतर, लहान आणि स्वस्त व्हर्जनची विक्री 2025 पासून भारत, चीन आणि जगातील इतर देशांमध्ये सुरू केली जाणार आहे.

ऑक्टोबर 2021 मध्येच कंपनीने जपानमधील प्रदर्शनादरम्यान बाइकचे मॉडेल डिजिटली लाँच केले होते. काही महिन्यांनंतर बाईकचा डेमोही दाखवण्यात आला होता.

एका चिनी व्यक्तीने ऑक्टोबर 2019 च्या सुमारास त्याच्या घरी फ्लाइंग बाईकची निर्मिती केली. यानंतर त्याने याची यशस्वी चाचणी देखील करुन दाखवली. याचा व्हिडिओ यूट्यूब आणि सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता.