तुम्हीही FD मध्ये अधिक गुंतवणूक करता का? चलनवाढीच्या दरानं होणार तोटा, जाणून घ्या कसा?

| Updated on: Nov 15, 2021 | 9:22 PM

वास्तविक व्याजदर जाणून घेण्यासाठी तो महागाई दरातून वजा केला जातो. किरकोळ चलनवाढीचा दर नुकताच 5.3 टक्के होता. जर बँकांनी 2-3 वर्षांच्या कालावधीसाठी 5.10 टक्के व्याज गृहीत धरले तर ते चालू आर्थिक वर्षाच्या महागाई दरापेक्षा कमी आहे. अशा परिस्थितीत अनेक बँकांमध्ये पाहायला मिळते. एफडीसारख्या योजनांवरील बँकांचे व्याजदर पाहिल्यावर कळेल.

तुम्हीही FD मध्ये अधिक गुंतवणूक करता का? चलनवाढीच्या दरानं होणार तोटा, जाणून घ्या कसा?
money
Follow us on

नवी दिल्लीः तुम्ही देखील अशा लोकांपैकी एक आहात, जे त्यांच्या बहुतेक गुंतवणूक मुदत ठेवी (FD) मध्ये जमा करतात? जर होय, तर ही तुमच्यासाठी वाईट बातमी असू शकते. जर तुम्ही FD वरील व्याज महागाई दराच्या तुलनेत मोजले तर तुम्हाला FD च्या जमा भांडवलावर नफ्यापेक्षा जास्त तोटा होऊ शकतो. कसे ते जाणून घेऊया.

ज्येष्ठ नागरिकांना थोडे जास्त व्याज मिळते

FD ही अशी ठेव योजना आहे, ज्यामध्ये लोकांना पैशावर चांगले व्याज मिळते. व्याजदर सरकारने घोषित केलाय, त्यामुळे कमाईची खात्री आहे. 1 वर्ष, 2 वर्षे, 3 वर्षे किंवा 5 वर्षांच्या FD वर किती परतावा मिळेल, याची कल्पना तुम्हाला पैसे जमा करताना मिळू शकते. सामान्य ठेवीदारांच्या तुलनेत ज्येष्ठ नागरिकांना थोडे जास्त व्याज मिळते. परंतु रिझव्‍‌र्ह बँकेने नुकत्याच केलेल्या एका विधानाने ठेवीदारांची चिंता वाढवलीय की, ते परताव्याच्या बाबतीत एफडी ठेवींवर किती अवलंबून राहू शकतात.

नकारात्मक वास्तविक परतावा काय?

अलीकडेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने सांगितले की, ग्राहक किंमत निर्देशांक (CPI) आधारित महागाई आता 2021-22 साठी 5.3 टक्के अंदाजित आहे. याचा अर्थ असा की, जर एखाद्या व्यक्तीने स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये पैसे जमा केले तर वास्तविक व्याजदर (-) 0.3 टक्के असेल. येथे वजा व्याजदर म्हणजे तुमची ठेव ऋणात जाईल. म्हणजेच ज्या ठेवीतून तुम्हाला नफा मिळायला हवा, तो तोटा होईल.

भारतातील व्याजदर आता विक्रमी नीचांकी पातळीवर

सोप्या शब्दात सांगायचे झाल्यास भारतातील व्याजदर आता विक्रमी नीचांकी पातळीवर आहेत. यामुळे तुमच्या गुंतवणुकीसाठी नकारात्मक रिअल रिटर्न एक महत्त्वपूर्ण धोका निर्माण होतो. जवळपास सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि खासगी क्षेत्रातील बहुतांश बँका सध्या एक वर्षाच्या मुदत ठेवींवर वार्षिक 5 ते 5.5 टक्के दराने व्याज देतात, तर महागाईचा दर 5 ते 6 टक्के आहे.

वास्तविक व्याज दर काय?

वास्तविक व्याजदर जाणून घेण्यासाठी तो महागाई दरातून वजा केला जातो. किरकोळ चलनवाढीचा दर नुकताच 5.3 टक्के होता. जर बँकांनी 2-3 वर्षांच्या कालावधीसाठी 5.10 टक्के व्याज गृहीत धरले तर ते चालू आर्थिक वर्षाच्या महागाई दरापेक्षा कमी आहे. अशा परिस्थितीत अनेक बँकांमध्ये पाहायला मिळते. एफडीसारख्या योजनांवरील बँकांचे व्याजदर पाहिल्यावर कळेल.

HDFC बँक 1-2 वर्षांच्या FD साठी 4.90 टक्के व्याजदर देते

खासगी क्षेत्रातील HDFC बँक 1-2 वर्षांच्या FD साठी 4.90 टक्के व्याजदर देते, 2-3 वर्षांसाठी 5.15 टक्के व्याज देते. सरकारद्वारे चालवल्या जाणार्‍या लहान बचत योजना बँकांच्या एफडी दरांपेक्षा चांगला परतावा देतात. यामुळेच दर थोडे जास्त असल्याने बँक एफडीमधून सरकारी बचत योजनांमध्ये पैसे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू झालीय. लहान बचत योजनेतील वास्तविक व्याजदर सकारात्मक आहे.

महागाईचा परिणाम

समजा, तुम्ही 20,000 रुपयांना रेफ्रिजरेटर घेण्याचा विचार करत आहात. पण त्याऐवजी पुढच्या वर्षी एक चांगला रेफ्रिजरेटर खरेदी करण्यासाठी तुम्ही ते पैसे वाचवायचे आणि गुंतवायचे ठरवले. तुम्ही ते 20,000 रुपये एका निश्चित-उत्पन्न साधनामध्ये 5 टक्के व्याज देणार्‍या गुंतवणुकीत गुंतवल्यास, तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य वर्षाच्या अखेरीस 21,000 रुपये होईल.

चालू वर्षातच रेफ्रिजरेटर विकत घेणे चांगले

पुढील एका वर्षात महागाईचा दर 6 टक्के झाला, तर तुम्ही ज्या रेफ्रिजरेटरची खरेदी करण्याचा विचार करत आहात त्याची किंमत 21,200 रुपये होईल. आता एक चांगला रेफ्रिजरेटर खरेदी करणे सोडा, तुमच्या गुंतवणुकीची रक्कम जुने मॉडेल विकत घेण्यासाठीही पुरेशी होणार नाही, कारण आता तुम्हाला हा खर्च परवडणारा नाही. तोच नकारात्मक वास्तविक व्याजदर आहे, जो तुमच्या खरेदीवर परिणाम करतो. त्यामुळे पुढील वर्षाची वाट पाहण्यापेक्षा चालू वर्षातच रेफ्रिजरेटर विकत घेणे चांगले.

संबंधित बातम्या

सरकारची वन धन योजना काय?, आदिवासींचे उत्पन्न वाढवण्यास कशी मदत मिळणार?

कोणत्या बँकेत तुम्हाला सर्वात स्वस्त गृह कर्ज मिळणार, प्रक्रिया शुल्क आणि EMI ची गणना कशी कराल?