Gold Rate Today | सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण, जाणून घ्या आजचे नवे दर…

| Updated on: Apr 16, 2021 | 11:32 AM

मागील व्यापार सत्रात तीव्र वाढ झाल्यानंतर शुक्रवारी (16 एप्रिल) सोने व चांदीच्या किंमती (Gold-Sliver Rate) भारतीय बाजारात घसरलेल्या पहायला मिळाल्या.

Gold Rate Today | सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण, जाणून घ्या आजचे नवे दर...
Gold Rate Today
Follow us on

मुंबई : मागील व्यापार सत्रात तीव्र वाढ झाल्यानंतर शुक्रवारी (16 एप्रिल) सोने व चांदीच्या किंमती (Gold-Sliver Rate) भारतीय बाजारात घसरलेल्या पहायला मिळाल्या. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) जून वायदा सोन्याची (Gold Rate) किंमत 0.12% प्रति 10 ग्रॅमने घसरली होती. तर, मे वायद्याच्या चांदीच्या किंमतीत (Silver Rate) 0.26% प्रतिकिलो घट झाली. गुरुवारी (15 एप्रिल) यूएस ट्रेझरी यील्ड एक महिन्याच्या नीचांकी पातळीवर आल्याने सोन्याच्या किंमती या आठवड्यात वाढल्याचे दिसून आले होते (Gold Silver Price today on 16 April 2021 latest rate and updates).

सोन्याची आजची किंमत (Gold Rate) : शुक्रवारी, एमसीएक्सवर (MCX) जून वायदा सोन्याच्या किंमती 55 रुपयांनी घसरून 47,120 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आल्या. गेल्या व्यापार सत्रात सोन्याचा दर 1.2 % वाढीसह बंद झाला होता.

चांदीची आजची किंमत (Silver Rate) : त्याच वेळी एसीएक्सवरील (MCX) मे वायदा चांदीचा भाव 179 रुपयांनी घसरून 68,375 रुपये प्रतिकिलो राहिला. मागील सत्रात चांदीही 1.2 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाली होती.

स्पॉट मार्केटमध्ये सोने आणि चांदीचा भाव

लग्नाचा हंगाम 22 एप्रिलपासून सुरू होत आहे, त्यापूर्वी सोन्याची मागणी वाढल्यामुळे सोने गुरुवारी महागले होते. सराफा बाजारात सोन्याच्या किंमतीत 159 रुपयांची वाढ झाली आणि ती प्रति 10 ग्रॅम 46301 रुपयांच्या पातळीवर बंद झाली.

चांदीचा दर देखील 206 रुपयांनी वाढला आहे आणि दिल्ली सराफा बाजारात त्याचे दर 67168 रुपये प्रति किलो होते (Gold Silver Price today on 16 April 2021 latest rate and updates).

सोन्याची खरेदी-विक्री करण्यासाठी नवीन नियम लागू

1 जून 2021 नंतर हॉलमार्कशिवाय सोन्याचे दागिने विकले जाऊ शकत नाहीत. ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अर्थात बीआयएसनेही याबाबत मागील महिन्यात एक अधिसूचना जारी केली होती. सोन्याची शुद्धता आता तीन श्रेणींमध्ये विभागली जाईल. प्रथम 22 कॅरेट, दुसरा 18 कॅरेट आणि तिसरा 14 कॅरेट अशा या श्रेण्या आहेत.

भारत दरवर्षी सुमारे 700-800 टन सोन्याची आयात करतो. ज्वेलरी हॉलमार्किंगच्या प्रक्रियेत, ज्वेलर्स बीआयएसच्या (BSI) ए अँड एच (A&H) सेंटरमध्ये दागिने ठेवतात आणि त्याची गुणवत्ता देखील तेथे तपासली जाते. या निकालानुसार, बीआयएस दागिने चिन्हांकित करते.

सोन्यामधील गुंतवणूक वाढली

कोरोनाचं संकट, लॉकडाऊन आणि नाईट कर्फ्यूसारखे नियम यामुळे अर्थव्यवस्था डळमळीत झाली आहे. त्यामुळे लोक पुन्हा एकदा सोन्यातील सुरक्षित गुंतवणुकीचा आधार घेत आहेत. मागील आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड्स (Gold ETF)मध्ये गुंतवणूकदारांनी तब्बल 6,900 कोटी गुंतवले.

(Gold Silver Price today on 16 April 2021 latest rate and updates)

हेही वाचा :

Gold rate today: लग्नसराईपूर्वीच सोनं पुन्हा एकदा महागलं, पटापट तपासा 10 ग्रॅम सोन्याचा भाव

Gold-Silver Price Today : सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करताय? आजचे दर जाणून घ्या