रिलायन्स, टाटा नव्हे तर ‘या’ आहेत देशातील सर्वोत्कृष्ट कंपन्या, सर्वच कर्मचारी समाधानी

| Updated on: Jun 22, 2021 | 12:25 PM

Top 10 companies in India | मुंबईतील एका संस्थेने ‘Great Places to Work’ या सर्वेक्षणातंर्गत एक यादी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये लॉजिस्टिक क्षेत्रातील DHL ही कंपनी अग्रस्थानी आहे. DHL नंतर कर्मचाऱ्यांसाठी चांगले वातावरण असलेल्या कंपन्यांमध्ये महिंद्रा समूहाचा क्रमांक लागतो.

रिलायन्स, टाटा नव्हे तर या आहेत देशातील सर्वोत्कृष्ट कंपन्या, सर्वच कर्मचारी समाधानी
Great Places to Work
Follow us on

मुंबई: आर्थिक उलाढालीचा विचार करायचा झाल्यास सध्याच्या घडीला रिलायन्स ही देशातील सर्वात मोठी कंपनी आहे. तर टाटा समूह हा देशातील सर्वात जुना उद्योगसमूह मानला जातो. मात्र, जेव्हा कर्मचाऱ्यांना (Employees) सुविधा पुरवण्याचा किंवा त्यांच्या समाधानी असण्याचा प्रश्न येतो तेव्हा या हे दोन्ही बलाढ्य उद्योगसमूह मागे पडतात. याबाबतीत डीएचएल आणि महिंद्रा या कंपन्या वरचढ ठरतात. (Top 10 workplaces and companies in India)

मुंबईतील एका संस्थेने ‘Great Places to Work’ या सर्वेक्षणातंर्गत एक यादी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये लॉजिस्टिक क्षेत्रातील DHL ही कंपनी अग्रस्थानी आहे. DHL नंतर कर्मचाऱ्यांसाठी चांगले वातावरण असलेल्या कंपन्यांमध्ये महिंद्रा समूहाचा क्रमांक लागतो.

आता आठवड्यात फक्त 4 दिवस काम आणि 3 दिवस सुट्टी, काय आहेत नवे नियम, कधीपासून लागू होणार?

कर्मचाऱ्यांची पसंती कोणत्या कंपन्यांना?

‘ग्रेट प्लेस टू वर्क’च्या यादीत डीएचल आणि महिंद्रा समूहानंतर Intuit India, Aye Finance P Limited आणि Synchrony International Services या कंपन्यांचा क्रमांक लागतो. तर सिस्को ही आयटी कंपनी यादीत दहाव्या स्थानावर आहे. याशिवाय, सेल्सफोर्स आणि अ‍ॅडॉब या कंपन्याही पहिल्या दहा कंपन्यांमध्ये आहेत.

रँकिंग कसे ठरवले जाते?

‘ग्रेट प्लेस टू वर्क’च्या यादीत स्थान मिळवण्यासाठी अनेक निकष पूर्ण करावे लागतात. कर्मचाऱ्यांचे अनुभव, त्यांना मिळणारी वागणूक, सुविधा अशा गोष्टींचे मूल्यांकन केले जाते. त्यावरुन कर्मचाऱ्यांसाठी सर्वाधिक चांगले वातावरण असलेल्या कंपन्यांची निवड केली जाते.

हेही वाचा :

ऑफिसमध्ये 15 मिनिटंही जास्त काम केलं तर मोजणार ओव्हरटाईम? सरकारचा नवा नियम

दररोज साडेनऊ तास बैठं काम करणाऱ्या व्यक्तींमध्ये लवकर मृत्यूची जोखीम अधिक

जास्त वेळ एकाच जागी बसणाऱ्यांना ‘या’ आजारांचा धोका

(Top 10 workplaces and companies in India)