तुम्ही दूरसंचार विभागाचा नोंदणीसाठीचा अर्ज पाहिलाय का? तर आताच काळजी घ्या

पीआयबी फॅक्ट चेकने ट्विट केले आहे की, दूरसंचार विभागाच्या नावे एक अर्ज प्रस्ताव आला, ज्यामध्ये एका व्यक्तीला नोंदणी शुल्क म्हणून 15,360 रुपये देण्यास सांगितले गेले. हे कागदपत्र बनावट असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे तुम्हीही सावध राहा. तुम्हाला फसवणुकीत अडकवण्याचा हा एक मार्ग आहे.

तुम्ही दूरसंचार विभागाचा नोंदणीसाठीचा अर्ज पाहिलाय का? तर आताच काळजी घ्या
fake news
| Edited By: | Updated on: Oct 26, 2021 | 9:26 AM

नवी दिल्लीः Fact Check News: तुम्ही व्हॉट्सअॅप किंवा कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दूरसंचार विभागाकडून अर्जाचा प्रस्ताव पाहिला आहे, ज्यामध्ये नोंदणी शुल्क म्हणून 15,360 रुपयांची मागणी करण्यात आलीय. जर होय, तर आताच काळजी घ्या. हा अर्ज प्रस्ताव पूर्णपणे बनावट आणि खोटा आहे. त्यामुळे त्यावर अजिबात विश्वास ठेवू नका. पीआयबी फॅक्ट चेकने ही माहिती दिलीय.

दाव्यामध्ये काय म्हटले आहे?

पीआयबी फॅक्ट चेकने ट्विट केले आहे की, दूरसंचार विभागाच्या नावे एक अर्ज प्रस्ताव आला, ज्यामध्ये एका व्यक्तीला नोंदणी शुल्क म्हणून 15,360 रुपये देण्यास सांगितले गेले. हे कागदपत्र बनावट असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे तुम्हीही सावध राहा. तुम्हाला फसवणुकीत अडकवण्याचा हा एक मार्ग आहे. त्यामुळे तुमची वैयक्तिक किंवा बँकेशी संबंधित माहिती कोणत्याही अज्ञात व्यक्तीसोबत कधीही शेअर करू नका. आजकाल सायबर गुन्ह्यांची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. कोरोना महामारीच्या काळात लोक आपला जास्तीत जास्त वेळ स्मार्टफोन किंवा इंटरनेटवर घालवतात. गुन्हेगारही याचा गैरफायदा घेत आहेत.

ट्विटर हँडलवर याचा स्क्रीनशॉटही शेअर

पीआयबी फॅक्ट चेकने आपल्या ट्विटर हँडलवर याचा स्क्रीनशॉटही शेअर केलाय. यामध्ये व्यक्तीला प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्यासाठी आपले ओळखपत्र जसे मतदार ओळखपत्र किंवा आधार कार्ड सादर करण्यास सांगितलेय. यामध्ये तुम्ही त्यांच्या खात्यात 15,360 रुपये भरण्यास सांगितले जाते, जे नोंदणी शुल्क आहे. यामध्ये तुमच्याकडून तुमची वैयक्तिक माहितीही विचारण्यात येते, यासाठी व्यक्तीला त्याचा फोन नंबर, ईमेल आयडी, घराचा पत्ता आणि जन्मतारीख विचारली जात आहे. त्यात असे नमूद केले आहे की, व्यक्तीला कागदपत्रे आणि पेमेंट जमा केल्याच्या तारखेपासून 1 तासानंतर त्याचा नोंदणी क्रमांक दिला जाईल. यासह 12 ते 15 कामकाजाच्या दिवसांत प्रमाणपत्रही पाठवले जाईल.

पीआयबी फॅक्ट चेक म्हणजे काय?

पीआयबी फॅक्ट चेक सरकारी धोरणे किंवा योजनांवरील चुकीच्या माहितीचे खंडन करते. सरकारशी संबंधित कोणतीही बातमी खोटी असल्याचा तुम्हाला संशय असल्यास तुम्ही पीआयबी फॅक्ट चेकला त्याबद्दल माहिती देऊ शकता. यासाठी तुम्ही या मोबाईल क्रमांकावर किंवा socialmedia@pib.gov.in ईमेल आयडीवर 918799711259 पाठवू शकता.

संबंधित बातम्या

Apple iPhone 12 केला होता ऑर्डर, भांड्याचा साबण मिळाला अन् 5 रुपयांचं नाणे, काय आहे प्रकरण?

Bank Holiday List : नोव्हेंबरमध्ये बँका 17 दिवस बंद राहणार, शाखेत जाण्यापूर्वी सुट्ट्यांची यादी तपासा