EMI कॅलक्युलेटर : ICICI बँकेचं गृह कर्जावरील व्याज महागलं, जाणून घ्या- तुमचा नवीन ईएमआय

| Updated on: May 08, 2022 | 6:39 PM

तुम्ही आयसीआयसीआय बँकेचे (ICICI Bank) ग्राहक असल्यास आणि गृहकर्जाचा लाभ घेतला असल्यास नवे दर आणि ईएमआय बाबत जाणून घेणे महत्वाचे ठरणार आहे.

EMI कॅलक्युलेटर : ICICI बँकेचं गृह कर्जावरील व्याज महागलं, जाणून घ्या- तुमचा नवीन ईएमआय
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us on

नवी दिल्ली- रिझर्व्ह बँकेने रेपो दरात (Repo Rate) वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अन्य बँकांनी देखील कर्जदरात वाढ करण्याची घोषणा केली आहे. खासगी क्षेत्रातील आयसीआयसीआय बँक आणि बँक ऑफ बडौदा यांनी व्याज दरवाढीची घोषणा केली आहे. रेपो दरवाढीच्या दुसऱ्याच दिवशी दोन्ही बँकांनी व्याज दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला. तुम्ही आयसीआयसीआय बँकेचे (ICICI Bank) ग्राहक असल्यास आणि गृहकर्जाचा लाभ घेतला असल्यास नवे दर आणि ईएमआय बाबत जाणून घेणे महत्वाचे ठरणार आहे. रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank Of India) रेपो दरात वाढ केली आहे. रेपो दरात 0.4 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. नव्या बदलासह रेपो दर 4.4 टक्क्यांवर पोहोचला आहे. रेपो दर वाढीमुळे अन्य बँकांच्या कर्जदरात वाढ होणे निश्चित मानले जात आहे.

किती रकमेवर किती व्याज-

तुम्ही आयसीआयसीआय बँकेकडून 35 लाख रुपयांचे गृह कर्ज घेतले. रेपो दरात वाढ केल्यामुळे व्याजदर 7.10 टक्क्यांवरुन 7.55 टक्क्यांपर्यंत जाऊ शकतो. सिबिल स्कोअर विशिष्ट मर्यादेच्या आत असल्यास तुम्हाला कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध होईल. तुम्ही 20 वर्षांच्या कालावधीसाठी 6.7 टक्क्यांनी कर्ज घेतले असल्यास ईएमआय 26,509 रुपये असेल. रेपो दरात वाढ केल्यामुळे नवा दर 7.10 टक्के होईल आणि नव्या ईएमआयची सुरुवात 27,346 रुपयांपासून होईल. त्यामुळे रेपो दरात वाढीमुळे ईएमआयमध्ये 837 रुपयांची वाढ अपेक्षित असेल.

तुमचा सुधारीत कर्जाचा हफ्ता-

35-75 लाख कर्जावरील व्याज दर 7.10 ते 7.70 टक्क्यांदरम्यान असेल. 50 लाख रुपयांच्या गृहकर्जावरील नवीन व्याजदर 7.10 टक्के असेल. 20 वर्षांच्या कालावधीसाठी वर्तमान ईएमआय 37,870 रुपये असेल. रेपो दरवाढीमुळे ईएमआय 7.10 टक्के होईल आणि ईएमआय 39,066 रुपयांवर पोहोचेल. त्यामुळे सुधारित नियमानुसार तुम्हाला अतिरिक्त 1196 रुपये अदा करावे लागतील.

कर्ज महागणार, मागणी घटणार-

रिझर्व्ह बँकेच्या नियमित समीक्षेच्या व्यतिरिक्त मध्यावधी धोरण समीक्षा रिझर्व्ह बँकेद्वारे करण्यात आली होती. इंडिया रेटिंग्सने विस्तृत अहवाल प्रकाशित केला आहे. उद्योग आणि सेवा क्षेत्राच्या वाढीच्या विकासावर कर्ज दर (Loan Distribution rate) वितरणावर थेट परिणाम होऊ शकतो. रेपो दरात वाढ केल्यानंतर देशातील सार्वजनिक तसेच खासगी क्षेत्रातील बँकांनी कर्ज दरात वाढ करण्याचा देखील निर्णय घेतला आहे.