जागतिक विकासदराच्या मंदावलेल्या गतीला भारत जबाबदार : IMF प्रमुख गीता गोपीनाथ

| Updated on: Jan 21, 2020 | 1:09 PM

जागतिक अंदाजित विकासदराच्या80 टक्के घसरणीला भारत जबाबदार आहे, असं गीता गोपीनाथ म्हणाल्या. 2020 मध्ये भारताचा  विकासदर अंदाजे 4.8% इतका राहील, असं त्यांनी नमूद केलं. 

जागतिक विकासदराच्या मंदावलेल्या गतीला भारत जबाबदार : IMF प्रमुख गीता गोपीनाथ
Follow us on

दावोस : आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (IMF) मुख्य अर्थतज्ज्ञ गीता गोपीनाथ (IMF Gita Gopinath on india slowdown ) पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. जागतिक अंदाजित विकासदराच्या80 टक्के घसरणीला भारत जबाबदार आहे, असं गीता गोपीनाथ म्हणाल्या. दावोस इथे सुरु असलेल्या जागतिक आर्थिक परिषद अर्थात वर्ल्ड इकोनॉमिक फोरममध्ये  (WEF) त्या बोलत होत्या. (IMF Gita Gopinath on india slowdown )

जर भारताचं दरडोई उत्पन्न अर्थात जीडीपी घसरला, तर त्याचा परिणाम जगाच्या आर्थिक विकासदरावर होतो. त्यामुळेच आम्ही जागतिक विकासदराचा अंदाज 0.1 टक्के कमी केला आहे, ज्याचा बहुतेक भाग हा भारताचा विकासदर घटल्याने आहे, असं गीता गोपीनाथ म्हणाल्या.  भारतासारख्या अन्य विकसनशील देशांतील मंदीचा परिणाम, जागतिक विकासदरावर झाला. 2020 मध्ये भारताचा  विकासदर अंदाजे 4.8% इतका राहील, असं त्यांनी नमूद केलं.

जागतिक विकासदराच्या 80 टक्के घसरणीला भारत जबाबदार आहे. 2019 मध्ये आम्ही जागतिक विकासदर 2.9 टक्के आणि 2020 मध्ये 3.3 टक्के राहील असा अंदाज वर्तवला होता. हा ऑक्टोबरच्या तुलनेत 0.1 टक्के कमी आहे. याचा बहुतेक भाग भारतातील मंदीमुळे प्रभावित आहे, ज्याचा फटका दोन्ही वर्षाच्या अंदाजित विकासदराला होत आहे, असं गीता गोपीनाथ म्हणाल्या.

कोण आहेत गीता गोपीनाथ?

  • गीता गोपीनाथ या आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (International Monetary Fund) मुख्य अर्थतज्ज्ञ आहेत.
  • 1 जानेवारी 2019 पासून त्या हे पद सांभाळत आहेत.
  • जागतिक स्तरावरील हे पद सांभाळणाऱ्या त्या पहिल्या महिला आहेत.
  • जगभरात मंदीचं सावट असताना, गीता गोपीनाथ यांच्याकडे हे आव्हानात्मक पद देण्यात आले आहे.
  • 47 वर्षीय गीता गोपीनाथ या हॉर्वर्ड विद्यापीठात अर्थशास्त्र हा विषय शिकवतात
  • जगातील एक चाणाक्ष आणि अनुभवी अर्थशास्त्रज्ञ म्हणून त्यांची ओळख आहे.
  • गीता गोपीनाथ यांनी यापूर्वी केरळ सरकारचे आर्थिक सल्लागार म्हणूनही कामकाज पाहिलं आहे.