नववर्षात करदात्यांसाठी मोठं गिफ्ट, आयकरात घट होण्याची शक्यता

| Updated on: Dec 27, 2019 | 9:43 PM

केंद्र सरकारच्या आगामी अर्थसंकल्पात (Income tax may cuts in new year budget) आयकरात घट केली जाण्याची शक्यता आहे.

नववर्षात करदात्यांसाठी मोठं गिफ्ट, आयकरात घट होण्याची शक्यता
संग्रहित छायाचित्र.
Follow us on

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या आगामी अर्थसंकल्पात (Income tax may cuts in new year budget) आयकरात घट केली जाण्याची शक्यता आहे. सरकार करात कपात करुन नोकरदारांना दिलासा देऊन खूश करण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याोसबतच देशाची आर्थिक (Income tax may cuts in new year budget) स्थिती बदलण्याचाही प्रयत्न केला जाणार असल्याचे बोललं जात आहे.

आयकर करात सर्वाधिक वार्षिक उत्पन्न असलेल्यांसाठी स्लॅब आणि करात घट केली जाण्याची शक्यता आहे. अर्थसंकल्पापूर्वी या प्रस्तावावर विचार केला जाणार आहे. या माध्यमातून सरकार आर्थिक स्थिती सुधारण्याचा प्रयत्न करणार आहे.

“वरिष्ठ पातळीवर निर्णय घेण्यापूर्वी अर्थमंत्रालयाकडून या प्रस्तावावर तसेच यातील फायदा आणि तोट्यावर विचार केला जाऊ शकतो. यामधील सर्व पर्यायावर विचार होत आहे.  दरम्यान 2020-21 च्या फेब्रुवारीमध्ये अर्थसंकल्प बजेट मांडला जाणार आहे”, असं एका अधिकाऱ्यांने सांगितले.

3 कोटी करदात्यांना फायदा

आयकरच्या स्ट्रक्चरमध्ये बदल केल्यास थेट 3 कोटी करदात्यांना याचा फायदा होणार आहे. देशाची आर्थिक स्थिती बिघडल्यामुळे नोकरदारांना खूश करण्यासाठी मोदी सरकारकडून हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात येत असल्याचे म्हटलं जात आहे. सरकारच्या या निर्णयामुळे नोकरदार वर्गाला मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

यापूर्वीच कॉर्पोरेट टॅक्समध्ये सूट

केंद्र सरकारने यापूर्वीच कॉर्पोरेट करात घट करत 1.45 लाखा कोटींचा टॅक्स सोडला. गुंतवणुकीत वाढ होण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले होते. कॉर्पोरेट करात घट केल्यानंतर आयकर करातही कपात व्हावी अशी मागणी होऊ लागली. कारण सरकारकडून गेल्यावर्षीही अर्थसंकल्पात नोकरदारांना काही सूट दिली नव्हती. तर सर्वाधिक उत्पन्न असणाऱ्या नोकरदारांच्या करात वाढ केली होती.

कर संरचना आढावा समितीचा प्रस्ताव

या समितीने म्हटले की, 10 लाख वार्षिक उत्पन्नावर सरसकट 10 टक्के कर, 10 ते 20 लाख वार्षिक उत्पन्नावर 20 टक्के, तर 20 लाख ते 2 कोटी वार्षिक उत्पन्नावर 30 टक्के कर लावण्याचा सल्ला समितीने दिला. त्यासोबतच अधिक उत्पन्न असलेल्या नोकरदारांच्या करातही घट करण्याचा सल्ला दिला आहे.

दरम्यान, 2.5 लाख वार्षिक उत्पन्न असेलेल करमुक्त आहेत. 2.5 आणि 5 लाख उत्पन्नावर 5 टक्के, 5 ते 10 लाख उत्पन्नावर 20 टक्के, 10 लाख रुपयांपेक्षा अधिक उत्पन्नावर 30 टक्के, तर 50 लाख पेक्षा अधिक उत्पन्नावर 10 ते 37 टक्के कर द्याव लागत आहे.