चीनला मोठा झटका देत आशियात नंबर वन झाली मुंबई, आता फक्त ही 2 शहरं पुढे

| Updated on: Mar 26, 2024 | 3:53 PM

गेल्या काही वर्षात भारताची आर्थिक प्रगतीने वेग घेतला आहे. अनेक नवे स्टार्टअप्सने चांगले यश मिळवले आहे. भारतात उद्योजकांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे मुंबईने बीजिंगला मागे टाकले आहे. आता आशिया खंडात भारत पहिल्या स्थानावर पोहोचला आहे.

चीनला मोठा झटका देत आशियात नंबर वन झाली मुंबई, आता फक्त ही 2 शहरं पुढे
Follow us on

शांघायस्थित हुरुन रिसर्च इन्स्टिट्यूटने अब्जाधीश भांडवलाबाबत एक नवा अहवाल प्रसिद्ध केला आहे. ज्यामध्ये आता मुंबई अब्जाधीशांची राजधानी बनली आहे. यापूर्वी चीनची राजधानी बीजिंग या स्थानावर होती. पण मुंबईने आता बीजिंगला मागे टाकलंय. इतकेच नाही तर या यादीत मुंबई जगातील तिसऱ्या क्रमांकाचे अब्जाधीश असलेले शहर ठरले आहे. या अहवालानुसार, न्यूयॉर्क पहिल्या स्थानावर आहे. जेथे 119 अब्जाधीश राहतात. दुसऱ्या स्थानावर लंडन आहे जेथे  ९७ अब्जाधीश राहतात. तर तिसऱ्या स्थानावर भारताची आर्थिक राजधानी मुंबई आहे. जेथे ९२ अब्जाधीश राहतात.

मुंबईने बीजिंगला टाकले मागे

87 अब्जाधीश असलेला शांघाय आता पाचव्या स्थानावर गेला आहे. 84 अब्जाधीशांसह शेन्झेन सहाव्या आणि हाँगकाँग 65 अब्जाधीशांसह सातव्या स्थानावर आहे. आशियातील अब्जाधीश शहरांमध्ये मुंबई पहिल्या स्थानावर आहे. हुरुन रिसर्चच्या अहवालानुसार, बीजिंगमध्ये अब्जाधीशांची संख्या 91 आहे, तर चीनमध्ये एकूण 814 अब्जाधीश राहतात, तर 92 अब्जाधीश मुंबईत आणि 271 अब्जाधीश भारतात राहतात.

मुंबईने दोन कारणांमुळे चीनच्या राजधानीला मागे टाकले आहे. एकीकडे मुंबईत २६ नवीन अब्जाधीशांची भर पडली असतानाच चीनची राजकीय आणि सांस्कृतिक राजधानी असलेल्या बीजिंगमध्ये १८ अब्जाधीशांची घट झालीये. मुंबईतील अब्जाधीशांची एकूण संपत्ती 445 अब्ज डॉलर आहे, जी गेल्या वर्षीच्या तुलनेत 47 टक्के अधिक आहे, तर बीजिंगच्या अब्जाधीशांची एकूण संपत्ती 265 अब्ज डॉलर्स आहे, जी 28 टक्के कमी झाली आहे. मुंबईतील संपत्ती क्षेत्रात ऊर्जा आणि औषधनिर्माण क्षेत्राचा समावेश आहे ज्यात मुकेश अंबानी सारख्या अब्जाधीशांची नावे आहेत, तर रिअल इस्टेट क्षेत्रातील दिग्गज मंगल प्रभात लोढा यांच्या संपत्तीत सर्वाधिक वाढ झाली आहे.

मुंबईत अब्जाधीशांची संख्या वाढली

अहवालानुसार, भारतातील सर्वाधिक नेट वर्थच्या बाबतीत, रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी हे सर्वात श्रीमंत भारतीय आहेत. श्रीमंतांच्या यादीत ते पहिल्या क्रमांकावर आहेत. त्यांची संपत्ती $115 अब्ज डॉलर इतकी आहे. जगातील टॉप-10 मध्ये त्यांचा समावेश आहे. अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी हे भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे. ते जगातील श्रीमंतांच्या यादीत 15 व्या क्रमांकावर आहेत. त्यांची संपत्ती $86 अब्ज डॉलर आहे.

एचसीएलचे शिव नाडर हे जागतिक क्रमवारीत 34व्या स्थानावर आहेत. सीरम इन्स्टिट्यूटचे सायरस एस पूनावाला 55व्या स्थानावर आहेत. फार्मास्युटिकल्सचे दिलीप सांघवी 61व्या स्थानावर, कुमार मंगलम बिर्ला 100 व्या स्थानावर आहे. राधाकिशन दमानी यांचाही भारतातील अव्वल अब्जाधीशांच्या यादीत समावेश आहे. भारतात आर्थिक प्रगती झपाट्याने होत आहे. त्यामुळेच देश आता नव्या उंचीवर पोहोचत आहे. आगामी काळात भारतातील अब्जाधीशांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.