Sensex | सेन्सेक्सच्या गंटागळ्या, गुंतवणूकदारांचे जवळपास दीड लाख कोटी बुडाले

| Updated on: Sep 03, 2019 | 4:40 PM

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक (BSE) तब्बल 769 अंकानी कोसळून 36562 अंकांवर (Sensex) बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजार अर्थात निफ्टीतही (Nifty) 225 अंकांची घटन होऊन 10 हजार 798 अंकांवर बंद झाली

Sensex | सेन्सेक्सच्या गंटागळ्या, गुंतवणूकदारांचे जवळपास दीड लाख कोटी बुडाले
Follow us on

Sensex मुंबई : मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक (BSE) तब्बल 769 अंकानी कोसळून 36562 अंकांवर (Sensex) बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजार अर्थात निफ्टीतही (Nifty) 225 अंकांची घटन होऊन 10 हजार 798 अंकांवर बंद झाली. बँकांचं विलिनीकरण, घसरलेला जीडीपी आणि मंदीची पार्श्वभूमी या सर्वाचा परिणाम सेन्सेक्सवर पाहायला मिळाला.

अमेरिका आणि चीनमधील ट्रेड वॉरचा परिणामही मुंबई शेअर बाजारावर दिसत आहे. त्याचाच परिणाम म्हणून सेन्सेक्स जवळपास 800 अंकांनी घसरला. सेन्सेक्समधील ही घसरगुंडी तब्बल 2.06 टक्के इतकी आहे. सेन्सेक्स कोसळल्याने गुंतवणूकदारांचे तब्बल 1.39 लाख कोटी रुपये बुडाले.  महत्त्वाचं म्हणजे सेन्सेक्सच्या 30 पैकी 27 शेअर्स कोसळले. तर निफ्टीमध्येही 50 पैकी 44 शेअर्सनी गटांगळ्या खाल्ल्या. बँकिंग, ऊर्जा आणि धातू यासारख्या क्षेत्रातील शेअर्स सर्वाधिक कोसळले.

आयटी शेअर्स उच्चांकावर

एकीकडे सेन्सेक्स कोसळत असताना इन्फोसिस आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिस (TCS) या कंपन्यांचे शेअर्स वधारले. इन्फोसिसचे शेअर्स 822.40 रुपयांवर तर TCS चे 2296.20  रुपयांवर पोहोचले.

1.39 लाख कोटी बुडाले

शेअर बाजार कोसळल्याने गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला.  गुंतवणूकदारांचे तब्बल 1.39 लाख कोटी रुपयांचं नुकसान झालं.