टर्म इन्शुरन्ससाठी कंपनीला हवा ग्राहक ‘धाडधाकट’! कोरोना बाधितांना मुदत विमा घेण्यात अटींचा डोंगर, विमा कंपन्यांची रडकथा…

| Updated on: Jan 15, 2022 | 12:19 PM

टर्म इन्शुरन्ससाठी कंपन्यांनी पुन्हा रडकथा सुरू केली आहे. ज्यांना कोविडची लागण झाली आहे. त्यांची विमा कंपन्यांनी अडवणूक सुरू केली आहे. त्यांची विमा संरक्षण रक्कम कमी करण्यात आली आहे. तसेच विमा खरेदी करण्यासाठी वैद्यकीय चाचणी अहवाल देणे आवश्यक करण्यात आले आहे.

टर्म इन्शुरन्ससाठी कंपनीला हवा ग्राहक धाडधाकट! कोरोना बाधितांना मुदत विमा घेण्यात अटींचा डोंगर, विमा कंपन्यांची रडकथा...
टर्म इन्शुरन्स
Follow us on

कोरोनाची तिसरी लाट येताच विमा कंपन्यांनी आपला पळपुटेपणा पुन्हा दाखवायला सुरुवात केली आहे. जर एखादी व्यक्ती कोरोना संकटातून सावरली असेल, तर त्याला ताबडतोब टर्म इन्शुरन्स पॉलिसी दिली जात नाही. त्यासाठी ग्राहकाला एक ते सहा महिने थांबावे लागू शकते. कोरोनाची तिसरी लाट येताच विमा कंपन्यांनी (Life Insurance company) विमा दाव्याच्या भीतीने  हात वर केले आहे.

विमा कंपन्या कोरोना रुग्णांसाठी टर्म इन्शुरन्स पॉलिसी (Term Insurance Policy) देण्यास  टाळाटाळ करत आहेत. अशा परिस्थितीत काय उपाय योजना करता येईल याची माहिती घेणे क्रमप्राप्त आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत अलीकडेच गाझियाबादमध्ये राहणाऱ्या विजय कुमारला ओमायक्रॉन  व्हेरिएंटची (Omicron Variant) लागण झाली. तो एका आठवड्यात बरा झाला, पण या एका आठवड्यात त्याला आपल्या कुटुंबाच्या भवितव्याची खूप काळजी वाटत होती. तो बरा होताच त्याने विमा एजंटला फोन केला आणि एक कोटी रुपयांची टर्म इन्शुरन्स पॉलिसी घेण्याची इच्छा व्यक्त केली.

विमा कंपन्यांची घाबरगुंडी

टर्म इन्शुरन्स पॉलिसी घेण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर विजय कुमार यांना अद्याप किमान 3 महिने टर्म इन्शुरन्स पॉलिसी मिळू शकली नाही, हे जाणून आश्चर्य वाटले. कोरोनाची तिसरी लाट येताच विमा कंपन्यांची घाबरगुंडी उडाली आहे. विमा कंपन्या, विशेषत: कोरोना रुग्णांसाठी टर्म इन्शुरन्स पॉलिसी देण्यास टाळाटाळ करत आहे.

अनेक नवीन अटी लादल्या

नवीन विमा घेणाऱ्यांसाठी एक ते तीन महिन्यांचा प्रतीक्षा अतिरिक्त वैद्यकीय चाचणी अहवाल विमा संरक्षण रक्कमेत कपात कोरोनामधून बरे होणाऱ्या लोकांना प्रतीक्षा करावी लागेल जर एखादी व्यक्ती कोरोनामधून सावरली असेल, तर त्याला/तिला त्वरित टर्म इन्शुरन्स पॉलिसी दिली जात नाही. त्याला एक ते सहा महिने थांबावे लागू शकते. शिवाय अशा रुग्णांमध्ये संसर्गाची पातळी जास्त असेल आणि भरतीची गरज असेल तर चेक-अप आणि एक्स-रे सारख्या अनेक अतिरिक्त वैद्यकीय चाचण्यांची ही मागणी आहे. गेल्या वर्षी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान लाखो लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला होता, तेव्हा विमा कंपन्या अशा रुग्णांना टर्म पॉलिसी देण्यास टाळाटाळ करत असल्याचे प्रथम दिसून आले.

प्रीमियम आणि कव्हरेजवरही परिणाम

इतकेच नव्हे तर मुदत टर्म खरेदी करणे तर कठीण होत आहेच, पण त्यांच्या प्रीमियम आणि कव्हरेजवरही परिणाम झाला आहे. कोविडच्या आधी सुमारे 40 वर्षे वयाच्या लोकांना ज्यांना सहजपणे 25 लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळू शकते. त्यांना कोविड संसर्ग झाल्यानंतर 10 लाखांहून अधिक संरक्षण मिळणे कठीण झाले आहे.  विशेष म्हणजे विमा कंपन्यांनी अलीकडेच टर्म प्लॅन प्रीमियममध्ये 10 ते 30 टक्क्यांनी वाढ केली आहे

नागरिकांना कोणता पर्याय ?

तज्ञांचे म्हणणे आहे की, कंपन्यांच्या या मनमानीविरोधात

विमा नियामक प्राधिकरण (IRDA)  कोणतेही मोठे पाऊल उचलू शकत नाही. कारण कंपन्यांना त्यांच्या व्यवसायाच्या संभाव्यतेसाठी अटी निश्चित करण्याचा अधिकार देण्यात आला आहे. विमा नियामक प्राधिकरण अथवा लोकपाल ही आपण विमा कंपनीचे ग्राहक असाल तरच काहीतरी करू शकतात.

कोरोनाच्या रुग्णाच्या बाबतीत त्याच्या आरोग्याबद्दल काहीही अंदाज बांधणे कठीण आहे, असे सर्टिफाइड फायनान्शीयल मणिकिरण सिंघल म्हणतात. त्यामुळे कंपन्या प्रतीक्षा कालावधी ठेवत आहेत, म्हणजे कोरोनामधून बरे होणाऱ्या लोकांना नवीन टर्म प्लॅन मिळविण्यासाठी प्रतीक्षा करावी लागेल. लोकपाल तुम्हाला पॉलिसीधारक झाल्यावरच मदत करू शकेल. त्यामुळे बाकीच्या निरोगी लोकांसाठी विनाविलंब त्वरित मुदत विमा किंवा आरोग्य विमा पॉलिसी घेणे हा चांगला पर्याय ठरू शकतो.

कंपनीला मेल करा आणि त्याची लेखी माहिती विचारा

इन्शुरन्स सोल्यूशन्सचे सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक युनियाल म्हणतात की, लोकांना कंपनीला मेल करण्याचा आणि ज्या आधारावर त्यांना पॉलिसी नाकारली जात आहे त्या आधारे माहिती मागण्याचा अधिकार आहे. मात्र, विमा नियामक आयआरडीएआयने या प्रकरणातील कंपन्यांना पूर्ण अधिकारी दिले आहेत. आर्थिक आणि आरोग्याच्या परिस्थितीच्या आधारे ते कोणालाही मुदत विमा देण्यास नकार देऊ शकतात.

मनी 9 चार सल्ला

जर तुम्ही सध्या कोविडमधून  सावरला असाल, तर तुम्हाला ताबडतोब टर्म पॉलिसी मिळणार नाही याची खात्री करा. त्यामुळे जे निरोगी आहेत आणि अद्याप कोणतेही टर्म पॉलिसी घेतलेले नाहीत त्यांनी विनाविलंब स्वत:साठी टर्म पॉलिसी घ्यावी. असे मानले जाते की आपण आपल्या एकूण वार्षिक उत्पन्नाच्या किमान १० पट विमा संरक्षण योजना घ्यावी.

संबंधित बातम्या : 

औषधांच्या किमती घटवण्यासाठी मोदी सरकारची पावलं, चीन-अमेरिकेसह 10 देशांचा अभ्यास दौरा

LIC प्लॅन | महिलांच्या स्वाबलंबनाची ‘आधारशीला’: 29 रुपयांची बचत, 3 लाखांची मॅच्युरिटी!