रिलायन्सकडून तेल व्यवसाय वेगळा करण्याचा निर्णय अखेर मागे, जाणून घ्या कारण

| Updated on: Nov 20, 2021 | 9:27 PM

कंपनीच्या वतीने असे सांगण्यात आले की, भागीदार सौदी अरामकोसोबत मिळून बदलत्या परिस्थितीत पुन्हा एकदा O2C व्यवसायाचे पुनर्मूल्यांकन करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. रिलायन्सच्या वतीने असे सांगण्यात आले की, जर नवीन कंपनी स्थापन झाली, तर तिला सौदी अरामकोला हिस्सा विकावा लागेल.

रिलायन्सकडून तेल व्यवसाय वेगळा करण्याचा निर्णय अखेर मागे, जाणून घ्या कारण
मुकेश अंबानी
Follow us on

नवी दिल्लीः रिलायन्स इंडस्ट्रीजपासून O2C व्यवसाय वेगळे करण्याचे आवाहन केले होते, तो निर्णय रिलायन्स इंडस्ट्रीजने मागे घेतला. रिलायन्सनं तेल ते केमिकल व्यवसाय वेगळे करण्यासाठी रिलायन्स इंडस्ट्रीजने एनसीएलटीसमोर अर्ज दाखल केला होता, अशी माहिती कंपनीने शेअर बाजाराला दिली आहे.

पुन्हा एकदा O2C व्यवसायाचे पुनर्मूल्यांकन करण्याचा निर्णय

कंपनीच्या वतीने असे सांगण्यात आले की, भागीदार सौदी अरामकोसोबत मिळून बदलत्या परिस्थितीत पुन्हा एकदा O2C व्यवसायाचे पुनर्मूल्यांकन करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. रिलायन्सच्या वतीने असे सांगण्यात आले की, जर नवीन कंपनी स्थापन झाली, तर तिला सौदी अरामकोला हिस्सा विकावा लागेल. अरामकोसोबत भारतात गुंतवणूक करण्यास ते नेहमीच उत्सुक असतील, असंही आरआयएलने सांगितले.

सौदी अरेबियात गुंतवणूक करणार

सौदी अरेबियातील गुंतवणुकीसाठी सरकारी पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू कंपनीला सहकार्य करणार असल्याचेही रिलायन्सने सांगितले. रिलायन्सने जारी केलेल्या निवेदनात स्पष्टपणे म्हटले आहे की, बदलत्या परिस्थितीत रिलायन्स आणि सौदी अरामको यांनी मिळून निर्णय घेतला आहे की, O2C व्यवसाय RIL पासून वेगळा केला जाणार नाही.

रिलायन्स 20 टक्के हिस्सा अरामकोला विकणार

रिलायन्सकडे जगातील सर्वात मोठी रिफायनरी आहे. ऑगस्ट 2019 मध्ये कंपनीने सौदी आरामकोसोबत $15 अब्जचा करार केला. सौदी अरामको ही जगातील सर्वात मोठी तेल निर्यातदार आहे. या करारांतर्गत रिलायन्स ऑइल ते केमिकल व्यवसायातील 20 टक्के हिस्सा अरामकोला विकणार आहे. हा करार मार्च 2020 पर्यंत पूर्ण व्हायला हवा होता, पण कोरोनामुळे त्याला विलंब झाला.

अरामकोच्या अध्यक्षपदी स्वतंत्र संचालक म्हणून नियुक्ती

या वर्षी जूनमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत सौदी अरामकोचे प्रमुख यासिर ओथमान अल-रुमायान यांची स्वतंत्र संचालक म्हणून नियुक्ती केली. अरामकोसोबतचा करार यशस्वी होण्याच्या दिशेने टाकलेले हे पाऊल असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

संबंधित बातम्या

पुढील वर्षी विम्याचा हप्ता 40 टक्क्यांनी वाढणार, कारण काय?

EPFO चा मोठा निर्णय, जमा पैशांपैकी 5% ‘या’ फंडात गुंतवले जाणार, फायदा काय होणार?