पेटीएम, मोबीक्विक, फोन-पे अॅप मार्चमध्ये बंद होणार?

| Updated on: Jul 05, 2019 | 4:41 PM

मुंबई : जर तुम्ही मोबाईल वॉलेट वापरत असाल तर तुम्हाला लवकरच एका नवीन संकटाला सामोरे जावं लागणार आहे. रिझर्व्ह बँकेकडून मार्च महिन्यापर्यंत मोबाईल वॉलेटवर टाच आणण्याची शक्यता आहे. कारण मोबाईल वॉलेट कंपनीने रिझर्व्ह बँकेच्या एकाही नियमांच पालन केलं नसल्याचं उघड झालं आहे. मात्र, तरीही या मोबाईल वॉलेटना 1 मार्चपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. येत्या 1 मार्च […]

पेटीएम, मोबीक्विक, फोन-पे अॅप मार्चमध्ये बंद होणार?
पेटीएम, फोन पे तसेच गुगल पे यासारख्या मोबाईल ई- वॉलेटचा वापर करणाऱ्यांना 31 ऑगस्टपर्यंत KYC पूर्ण करावी लागणार आहे. अन्यथा 1 सप्टेंबरपासून तुम्हाला मोबाईल वॉलेटचा वापर करता येणार नाही. नुकतंच याबाबत भारतीय रिझर्व्ह बँकेने विविध मोबाईल वॉलेट कंपन्यांना नोटीस पाठवले आहे.
Follow us on

मुंबई : जर तुम्ही मोबाईल वॉलेट वापरत असाल तर तुम्हाला लवकरच एका नवीन संकटाला सामोरे जावं लागणार आहे. रिझर्व्ह बँकेकडून मार्च महिन्यापर्यंत मोबाईल वॉलेटवर टाच आणण्याची शक्यता आहे. कारण मोबाईल वॉलेट कंपनीने रिझर्व्ह बँकेच्या एकाही नियमांच पालन केलं नसल्याचं उघड झालं आहे. मात्र, तरीही या मोबाईल वॉलेटना 1 मार्चपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. येत्या 1 मार्च पर्यंत आरबीआयच्या काही नियम आणि अटी सर्व मोबाईल वॉलेट कंपनींना पूर्ण कराव्या लागणार आहेत. जर 1 मार्चपर्यंतही नियम पूर्ण केले नाहीत, तर मात्र मोबाईल वॉलेट कंपन्यांना टाळे ठोकावे लागणार आहेत.

‘केवायसी’ पूर्ण नाही!

रिझर्व्ह बँकेने देशात लायसन्स असलेल्या सर्व मोबाईल वॉलेट कंपनींना आपल्या ग्राहकांच्या केवायसी नियम पूर्ण करण्यासाठी 28 फेब्रुवारी 2019 पर्यंत वेळ दिला आहे. काही कंपन्या हा आदेश पूर्ण करु शकल्या नाहीत. यामुळे देशातील अनेक मोबाईल वॉलेट बंद होण्याची शक्यता आहे.

पेमेंट इडस्ट्रीमध्ये भीतीचे वातावरण

सगळ्या ग्राहकांचे व्हेरिफिकेशन (KYC) फेब्रुवारी 2019 पर्यंत पूर्ण होणार नाही, अशी आता पेमेंट इंडस्ट्रीला भीती वाटत आहे. आरबीआयने केवायसीसाठी ही डेडेलाईन दिली आहे. आरबीआयने मोबाईल वॉलेट्स कंपनींना ऑक्टोबर 2017 मध्ये निर्देश दिले होते की, त्यांनी आपल्या ग्राहकांची नो युअर कस्टमरच्या गाईडलाईंन्सनुसार माहिती जमा करावी.

ई-केवायसीमध्ये अडचणी

केवायसी करण्यासाठी अनेकदा आधार कार्डचा वापर केला जायचा. मात्र सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार, प्रायव्हेट कंपन्या व्हेरिफिकेशनसाठी आधार कार्डचा वापर करु शकत नाहीत. यामुळे मोबाईल कंपनी केवायसी करु शकत नाही. मात्र आरबीआयनेही याशिवाय दुसरा कोणता मार्ग सुचवला नाही.

चार वर्षांआधी सुरु झालेली डिजीटल पेमेंट

मोबाईल वॉलेट्च्या मदतीने अंदाजे 4 वर्ष आधी डिजीटल पेमेंटची सुरुवात झाली होती. दरम्यान पहिल्यापेक्षा आता खूप कमी लोक यामध्ये उरले आहेत. पेटीएम, मोबीक्विक, फोन-पे, अमेझॉनसारख्या कंपनी यामध्ये सहभागी आहेत.

95 टक्के अकाऊंट बंद होण्याची शक्यता

संपूर्ण देशात 5 टक्क्यांपेक्षा कमी मोबाईल वॉलेट ग्राहकांनी केवायसी पूर्ण केली आहे. तर अशामध्ये 95 टक्के मोबाईल वॉलेट हे केवायसीशिवाय सुरु आहेत आणि आता तेच 95 टक्के ग्राहकांचे अकाऊंट बंद होण्याची शक्यता आहे.