UGC कडून Professor Of Practice पदाला मान्यता! PhD शिवाय होता येणार प्रोफेसर

| Updated on: Oct 01, 2022 | 3:35 PM

प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस हे एक फॅकल्टी पद आहे ज्यामध्ये कोणत्याही औपचारिक शैक्षणिक पात्रतेशिवायही महाविद्यालयांमध्ये शिकवण्यासाठी उद्योग आणि व्यावसायिक तज्ञांची भरती केली जाऊ शकते.

UGC कडून Professor Of Practice पदाला मान्यता! PhD शिवाय होता येणार प्रोफेसर
Professor without phD
Image Credit source: Social Media
Follow us on

खुशखबर! युजीसीने प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस पदाला मान्यता दिलीये. प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस हे एक फॅकल्टी पद आहे ज्यामध्ये कोणत्याही औपचारिक शैक्षणिक पात्रतेशिवायही महाविद्यालयांमध्ये शिकवण्यासाठी उद्योग आणि व्यावसायिक तज्ञांची भरती केली जाऊ शकते. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमानुसार उच्च शिक्षण संस्थेत 10 टक्क्यांपर्यंत प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस पदांची भरती करता येणारे. या पदाचा जास्तीत जास्त कालावधी चार वर्षांपर्यंत असणार आहे.

प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस पदासाठी उमेदवारांना 15 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि सोशल सायन्सपासून मीडिया आणि सशस्त्र दलापर्यंत या क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या उमेदवारांना या पदासाठी पात्र मानले जाईल. सध्या नियमित प्राध्यापक किंवा सहयोगी प्राध्यापक पदासाठी पीएचडी आवश्यक आहे.

युजीसीच्या मार्गदर्शक सूचनांमधील प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस पदाबाबत असे म्हटले होते की, “जर उमेदवाराकडे सर्वोत्तम व्यावसायिक अनुभव असेल तर औपचारिक शैक्षणिक पात्रतेची आवश्यकता नाही. भरतीसाठी आवश्यक असलेली प्रकाशने आणि इतर पात्रतेच्या निकषातूनही या तज्ज्ञांना सूट देण्यात आली आहे. मात्र, आपल्या विभागाच्या जबाबदाऱ्या पार पाडण्याचे कौशल्य व्यावसायिकांकडे असायला हवे.’ .

यूजीसीने म्हटले आहे की, हे पाऊल विद्यापीठे आणि महाविद्यालयांमधील प्राध्यापकांची संसाधने वाढविण्यासाठी कार्य करेल. तसेच विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष जगातील आवश्यक सराव आणि अनुभव यांची माहिती वर्गातच मिळेल.”

“अनेक उद्योग आता पदवीधरांना कामावर घेत आहेत आणि त्यांना कामावर घेण्यापूर्वी त्यांना प्रशिक्षण देत आहेत. उद्योग तज्ञांचा अध्यापनात समावेश केल्यास उद्योग आणि उच्च शैक्षणिक संस्थांना फायदा होईल.”