बँक ऑफ बडोद्यावर 207 कोटी रुपयांच्या हेराफेरीचा आरोप, सीबीआयकडून गुन्हा दाखल

| Updated on: Apr 19, 2021 | 8:11 PM

निधीचा गैरवापर केल्याच्या आरोपाखाली बँक ऑफ बडोदा आणि दिल्ली सरकारच्या अख्यारितील अज्ञात अधिकाऱ्यांविरुद्ध केंद्रीय अन्वेषण विभागाने अर्थात सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे (CBI register FIR against bank of Baroda for 207 crore of misappropriation)

बँक ऑफ बडोद्यावर 207 कोटी रुपयांच्या हेराफेरीचा आरोप, सीबीआयकडून गुन्हा दाखल
बँक ऑफ बडोदाने लाँच केले हे विशेष डेबिट कार्ड
Follow us on

नवी दिल्ली : निधीचा गैरवापर केल्याच्या आरोपाखाली बँक ऑफ बडोदा आणि दिल्ली सरकारच्या अख्यारितील अज्ञात अधिकाऱ्यांविरुद्ध केंद्रीय अन्वेषण विभागाने अर्थात सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे. 207 कोटी रुपयांच्या हेराफेरीच्या आरोपांखाली 16 एप्रिलला एफआयआर दाखल करण्यात आला, अशी माहिती सीबीआय अधिकाऱ्यांनी दिली (CBI register FIR against bank of Baroda for 207 crore of misappropriation).

नेमकं प्रकरण काय?

दिल्ली अर्बन शेल्टर इम्प्रूव्हमेंट बोर्डच्या (DUSIB) लेखा विभागाची 13 एप्रिल रोजी अचानक चौकशी करताना अनियमितता उघडकीस आली, असं सीबीआयने सांगितलं. 1 सप्टेंबर 2020 ते 31 मार्च 2021 दरम्यान DUSIB च्या निधीतील 214 कोटी रुपये फॉर्ममध्ये गुंतवणूक करण्यात आल्याचं उघड झालं (CBI register FIR against bank of Baroda for 207 crore of misappropriation).

DUSIB चं फक्त सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये खातं

बीओबी आणि पहाडगंजद्वारे जारी करण्यात आलेले 112 एफडीआर केवळ A4 आकाराच्या पेजवर आहेत. तसेच सुरक्षे संबंधित कागपत्रे तिथे मिळाली नाहीत. विशेष म्हणजे DUSIB ने आपले खाते फक्त सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये असल्याचा खुलासा केला. त्यामुळे बँक ऑफ बडोदामध्ये DUSIB चं खातं असल्याचा प्रश्नच येत नाही, असं सीबीआयने सांगितलं.

काही अधिकाऱ्यांना अटक

या प्रकरणी काही अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. DUSIB हे दिल्ली सरकारच्या नियंत्रणात काम करतं. दिल्लीतील झोपडपट्ट्यांचे आणि झोपडपट्ट्यांमधील रहिवाशांचे जीवनमान सुधारण्याची जबाबदारी प्रामुख्याने डीयूएसआयबीवर आहे. हा विभाग मुख्यमंत्र्यांची स्वायत्त संस्था म्हणून काम करते.

हेही वाचा : पब्लिक वायफाय वापरताय? सावधान ! हॅकर्सकडून मोठ्या उचापत्या