चाइल्ड पोर्नोग्राफी विरोधात CBI ची आजयपर्यंतची सर्वात मोठी कारवाई; 20 राज्यांत 56 ठिकाणी धाडसत्र

| Updated on: Sep 24, 2022 | 4:25 PM

देशभरात चाइल्ड पोर्नोग्राफीशी संबधीत गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. यामुळे लहान मुलांचे आयुष्य उद्धवस्त होत आहे. लहान मुलांना चाइल्ड पोर्नोग्राफीचे शिकार बनवणाऱ्यांविरोधात CBI ने कारवाईचा फास आवळला आहे.

चाइल्ड पोर्नोग्राफी विरोधात CBI ची आजयपर्यंतची सर्वात मोठी कारवाई; 20 राज्यांत 56 ठिकाणी धाडसत्र
Follow us on

नवी दिल्ली : चाइल्ड पोर्नोग्राफी विरोधात सेंट्रल ब्यूरो ऑफ इन्वेस्टिगेशन अर्थात CBI ने आजयपर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे. देशभरात 20 राज्यांत 56 ठिकाणी धाडी टाकल्या आहेत. यामुळे चाइल्ड पोर्नोग्राफीशी संबधीत लोकांचे धाबे दणाणले आहेत. इंटरपोलच्या अलर्टनंतर CBI ने ही कारवाई केली आहे. CBI ने या विशेष मोहिमेला ‘ऑपरेशन मेघदूत’असे नाव दिले आहे.

देशभरात चाइल्ड पोर्नोग्राफीशी संबधीत गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. यामुळे लहान मुलांचे आयुष्य उद्धवस्त होत आहे. लहान मुलांना चाइल्ड पोर्नोग्राफीचे शिकार बनवणाऱ्यांविरोधात CBI ने कारवाईचा फास आवळला आहे.

चाइल्ड पोर्नोग्राफीचे रॅकेट चालवणाऱ्या अनेक टोळ्या सक्रिय असल्याची माहिती CBI ला मिळाली आहे. या टोळ्या मुलांना मेंटली टॉर्चर करुन त्यांना ब्लॅकमेल करत त्यांच्याकडून अशा प्रकारची कृत्ये करुन घेतात.

या टोळ्यांचे वेगवेगळे गट असून ते मुलांना वैयक्तीकरीत्या टार्गेट करत असल्याचे तपास समोर आले आहे. सीबीआयला इंटरपोलच्या माध्यमातून या प्रकरणाची माहिती मिळाली होती.

यानंतर सीबीआयने धडक कारवाई सुरु केली आहे. दिल्ली, मुंबई, बंगळुरू, पाटणासह 20 राज्यांमध्ये धाडसत्र राबवले. या कारवाईअंतर्गत महत्वाचे पुरावे CBI च्या हाती लागले आहेत. यामुळे चाइल्ड पोर्नोग्राफीचे रॅकेट खिळखिळे होण्यास मदत होणार आहे.

चाइल्ड पोर्नोग्राफीशी संबधीत गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहे. चाइल्ड पोर्नोग्राफीशी संबधीत व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणाच व्हायरल होत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने चाइल्ड पोर्नोग्राफीच्या वाढत्या गुन्ह्यांबाबत चिंता व्यक्त केली आहे.