Buldana : समलैंगिक संबंधातून मारहाण करून एकाचा खून, शुटिंग करून पैशासाठी ब्लॅकमेल केले; सहाजणांवर गुन्हा दाखल

| Updated on: Apr 17, 2022 | 9:08 AM

बुलढाण्यात (Buldana) एक अजब प्रकार उघडकीस आला आहे. समलैगिंक संबंधातून एकाचा मृत्यू झाल्याचा प्रकरण उघडकीस आलं आहे. बुलढाणा जिल्ह्यातील धामणगाव बढे (Dhamangaon Badhe) येथील श्रीराम शेळके (Shreeram Shelakhe) यांचा मृत्यू झाला आहे.

Buldana : समलैंगिक संबंधातून मारहाण करून एकाचा खून, शुटिंग करून पैशासाठी ब्लॅकमेल केले; सहाजणांवर गुन्हा दाखल
संपत्तीच्या वादातून काकांनीच पुतण्याला 11 वेळा भोसकले
Image Credit source: टीव्ही9
Follow us on

बुलढाणा – बुलढाण्यात (Buldana) एक अजब प्रकार उघडकीस आला आहे. समलैगिंक संबंधातून एकाचा मृत्यू झाल्याचा प्रकरण उघडकीस आलं आहे. बुलढाणा जिल्ह्यातील धामणगाव बढे (Dhamangaon Badhe) येथील श्रीराम शेळके (Shreeram Shelakhe) यांचा मृत्यू झाला आहे. त्यांचा मृत्यू हा समलैगिंक संबंधात मारहाण केल्याने झाला असल्याचा संशय आहे. या प्रकरणात विविध पद्धतीने शुटींग करून वारंवार पैशाची मागणी केली होती. त्यामुळे आनंद गवई यांच्यासह पोलिसांनी त्यांच्या सहा मित्रांवरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत्यू इसमाचे आणि आनंद गवई यांचे समलैगिंक संबंध होते अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. पोलिसांनी दाखल झालेल्या तक्रारीनुसार चौकशी करत आहेत. हा अत्यंत भयानक प्रकार अजून यांच्यातून अजून काही गोष्टी उघड होण्याची शक्यता आहे.

नेमकं काय आहे प्रकरण

बुलढाणा जिल्ह्यात बडे गाव आहे. तिथले श्रीराम शेळके रहिवासी आहेत. श्रीराम शेळके यांचा मृत्यू झाला. अनेकांनी त्यावर संशय व्यक्त केला होता. त्यावेळी श्रीराम शेळके यांचे आनंद गवई यांच्यासोबत समलैंगिक संबंध असल्याची चर्चा सुरु झाली. तसेच अनेक वेगवेगळ्या पद्धतीचे व्हिडीओ तयार करून शेळके यांना ब्लॅक मेल केले आहे. तसेच पैशासाठी मारहाण सुध्दा केल्याची चर्चा होती. या प्रकरणी आनंग गवई यांच्यासह सहा जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे.