Tamil Nadu Accident : भरधाव बसची कंटेनरला डाव्या बाजूने मागून धडक! डाव्या बाजूला बसलेले 6 ठार, 10 जखमी

| Updated on: Jul 08, 2022 | 12:57 PM

Tamil Nadu Bus Accident : या अपघाताची माहिती मिळाल्यानंतरत पोलिसांनी लगेचच अपघातस्थळी धाव घेतली.

Tamil Nadu Accident : भरधाव बसची कंटेनरला डाव्या बाजूने मागून धडक! डाव्या बाजूला बसलेले 6 ठार, 10 जखमी
Follow us on

तामिळनाडू (Tamil Nadu Accident News) राज्य परिवहन महामंडळाच्या बसचा भीषण अपघात (TNSTC Bus Accident) झाला. या बसने कंटनेरला मागून धडक दिल्यानं बसमधील सहा प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तर दहा जण गंभीररीत्या जखमी झाले. मृतांमध्ये दोघा महिलांचा समावेश आहे. तामिळनाडू राज्य परिवहन महामंडळाच्या या बसमध्ये अनेक प्रवासी होते. भरधाव वेगात असणाऱ्या बसवरील चालकाचं नियंत्रण सुटलं आणि या बसची डावी बाजू कंटेनरला जोरदार धडकली. यावेळी बसमध्ये डाव्या बाजूला बसलेल्या प्रवाशांना जोरदार फटका बसला आणि बसमधील प्रवाशांवर काळानं घाला घातला. सहा जण या अपघातात ठार झाले असून दहा जखमींवर उपचार सुरु आहेत. या अपघाताबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi News) यांनीदेखील मृतांच्या कुटुंबीयांप्रती दुःख व्यक्त केलंय. या अपघातानंतर हायवेवरील वाहतुकीचा खोळंबा झाला होता. अक्षरशः या बसचा पत्रा फाडून बसमधील मृत प्रवाशांना बाहेर काढावं लागलं. या भीषण अपघातानंतरची दृश्यंही अंगावर काटा आणणारी होती.

कोयंबेडूच्या सीएमबीटी येथूल चिदंबरम इथं ही बस निघाली होती. मात्र सकाळी 7.45 मिनिटांची थोझुपेडू इथं या बसला अपघात झाला. चेन्नई तिरुची महामार्गावर ही दुर्घटना घडली. या बसच्या डाव्या बाजूचा भाग अपघातामध्ये पूर्णपणे चक्काचूर झाला होता. त्यावरुन या अपघाताची तीव्रता किती भयंकर होती, याची कल्पना करता येऊ शकेल.

हे सुद्धा वाचा

पाहा व्हिडीओ :

या अपघाताची माहिती मिळाल्यानंतरत पोलिसांनी लगेचच अपघातस्थळी धाव घेतली. जखमींना तातडीनं रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. तर पुढील तपास पोलिसांकडून केला जातोय. याअपघातामुळे हायवेवरील वाहतूक विस्कळीत झाली होती. क्रेनच्या मदतीने अपघात ग्रस्त बस हटवण्यात आली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुःख व्यक्त

कांचिपुरम जिल्ह्यात अपघाताची भीषण घटना ताजी असतानाच आणखी एका अपघातानं सगळ्यांना हादरवलं. गुरुवारी कांचिपुरम इथं दोन कार एका सिमेंट मिक्सरचा विचित्र अपघात झाला होता. या अपघातामध्ये एका चिमुरड्यासह एकूण तिघांचा मृत्यू झाला होता.